मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयत हर घर तिरंगा या उपक्रमाच्या राष्ट्रीय ध्वज विक्री व वितरणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते संपन्न.. - दैनिक शिवस्वराज्य

मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयत हर घर तिरंगा या उपक्रमाच्या राष्ट्रीय ध्वज विक्री व वितरणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते संपन्न..



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर झेंडा’ उपक्रमाच्या राष्ट्रीय ध्वज विक्री व वितरणाचा शुभारंभ दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आले.
     तसेच यावेळी मंद्रूप अप्पर तहसील कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले. 
यावेळी अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सरपंच कलावती खंदारे,नायब तहसीलदार जितेंद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
    देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे.अमृत महोत्सवी वर्षात प्रत्येकांनी घरावरती व कार्यालया वरती तसेच दुकानावर तिरंगा फडकवायाच आहे. अमृत महोत्सवी वर्षात आपण आहोत हे आपले भाग्यच आहे असे मनोगत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
       सर्वांनी स्वतःहून प्रेरित होऊन हर घर झेंडा लावून सहभागी व्हावे. शासनाकडून तिरंगा उपलब्ध करून देत आहे. या सोहळ्यामध्ये सर्वांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून सर्व बांधवांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. प्रत्येक नागरिकां राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
    या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी मानले. यावेळी महसूल कर्मचारी व परिसरातील नागरिक बहुसंख्येत उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads