दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा रेवणसिद्ध मेंडगुदले यांची निवड.. - दैनिक शिवस्वराज्य

दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा रेवणसिद्ध मेंडगुदले यांची निवड..


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनच्या अध्यक्षपदी रेवणसिद्ध मेंडगुदले यांची एकमताने निवड करण्यात आली.दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार असोशिएशनची बैठक मंद्रूप येथील शासकीय विश्रामगृहात आज आयोजित करण्यात आली होती.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार नंदकुमार वारे व अमोगसिध्द लांडगे हे होते.यावेळी बैठकीत नूतन तालुकाध्यक्ष निवडीचा प्रस्ताव पत्रकार प्रा.डाँ.राजदत्त रासोलगीकर यांनी दिला. यावेळी पत्रकार मल्लिकार्जुन कांबळे यांनी अध्यक्षपदासाठी रेवणसिद्ध मेंडगुदले यांचे नाव सुचविले.त्यास पत्रकार शिवराज मुगळे यांनी अनुमोदन दिले.यावेळी सर्वानुमते मेंडगुदले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
    यावेळी इतर पदाधिकारांची निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी मल्लिकार्जुन कांबळे,कार्याध्यक्षपदी महासिध्द साळवे,सचिवपदी प्रा.डाॅ.राजदत्त रासोलगीकर,सहसचिव नारायण घंटे,खजिनदार मधूकर राठोड व शिवराज मुगळे,प्रसिध्दी प्रमुखपदी समीर शेख तर सदस्यपदी प्रमोद जवळकोटे,बसवराज माळगे,महम्मद नदाफ,अल्ताफ शेख,आसिफ शेख,सागर कोळी यांची निवड करण्यात आली.या निवडीनंतर नूतन पदाधिकार्‍यांचा दक्षिण सोलापूर पत्रकार असोशिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आले.




Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads