हुतात्मा परशुराम विद्यालयात शालेय मँरेथॉन स्पर्धा संपन्न
सातारा प्रतिनिधी:-रविना यादव.
दि-२९/८/२०२२.
(वडूज) येथील हुतात्मा परशुराम विद्यालयाच्या एन सी सी छात्र कॅडेट यश चंद्रकांत तुपे याने दहा किलोमीटर म्यारेथॉन स्पर्धा 32 मिनिटात पूर्ण करून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर मुलींच्या पाच किलोमीटर म्यारेथॉन स्पर्धेत सायली कैलास शिंगाडे हिने 22 मिनिटात पाच किलोमीटर धावून प्रथम क्रमांक मिळविला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना 22 महाराष्ट्र एन सी सी बटालियन सातारा कामांडीग ऑफिसर कर्नल दीपक टोंगे व एडमं ऑफिसर कर्नल मोहन भालसिंग याच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज इथे ही म्यारेथॉन स्पर्धा संपन्न झाली.
वडूज दहिवडी मार्गावर ही स्पर्धा संपन्न होत असताना,
दहा किलोमीटर मुलांच्या साठी तर पाच किलोमीटर मुलींच्या साठी स्पर्धा होती.
विद्यार्थ्यांना उप प्राचार्य महेश गोडसे यांनी प्रोस्थाहन दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्यात उत्साह होता स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी वडूज पोलीस स्टेशन आणि वडूज ग्रामीण रुग्णालय यांचेकडून आंबूलन्स उपलब्ध करून देण्यात आली होती.
स्पर्धेला सुरवात करताना पालक संघाचे सह सचिव विजय शिंदे, उप प्राचार्य महेश गोडसे पर्यवेक्षक दिलीप फडतरे, पर्यवेक्षिका भारती माने, डी सी पंडित सर, स्मिता जोशी, जालिंदर धुळप , एन सी सी आधिकारी राजेंद्रकुमार जगदाळे, पालक आणि वडूज नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यालयातील शिक्षक शिक्षिका जागो जागी थांबून वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत करत होते.
ज्ञानेश्वर लहारे, अनिल राऊत, किरण कांबळे, निवास मगर, संदीप फडतरे, अनिल माने रवींद्र एलमर, संदीप तिवाटने, अजय शेटे रत्नाकर काळे, एस येऊ काळे , सौ भिंगरदेवे, वर्षा भोसले किरण लोखंडे पंकज पवार यांनी म्यारेथॉन स्पर्धेत महत्वाची कामगिरी केली.
विद्यार्थ्यांचा उत्साह पाहता स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना वडूज नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ मनीषा रविंद्र काळे यांनी बक्षीस म्हणून चषक देण्यात आले.
प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला यश तुपे १२ आॉगस्ट रोजी वडूज येथे झालेल्या खुल्या मँरेथॉन स्पर्धेत ही त्याने यश प्राप्त केले आहे.याने आतापर्यंत सात म्यारेथॉन स्पर्धा जिंकल्या असून खुल्या गटातील स्पर्धकांना आव्हान देत अगदी कमी वेळात त्याने हे अंतर पूर्ण केले .इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेला यश दररोज दहा किलोमीटर धावतो.
मनात जिद्द आणि चिकाटी असल्यामुळे आपण सेनादलात जाऊन चाळीस किलोमीटर बीपीटी पूर्ण करणार असल्याचे त्याने बोलून दाखवले.
खटाव तालुक्यात एनकुल गावाचा हा विध्यार्थी वडूज च्या हुतात्मा परशुराम विद्यालयात खास एन सी सी मिळावी म्हणून प्रवेश घेतला आहे. ज्या दिवशी एन.सी सी.ची निवड चाचणी झाली त्या दिवशी चारशे मुलात त्याने प्रथम क्रमांक मिळवून एन.सी.सी लिस्ट मध्ये आपले नाव समाविष्ठ करून घेतले.
भारतीय सैन्यदळविषयी आवड असल्याने तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
त्याबद्दल एन सी सी आधिकारी आणि क्रीडा मार्गदर्शक श्री राजेंद्र जगदाळे यांनी पाचशे रुपयांचे बक्षिसे उप प्राचार्य यांच्या हस्ते देऊन सन्मानित केले
यशस्वी खेळाडू आणि सर्व सन्माननीय उपस्थितांचे आभार शिक्षक प्रतिनिधी शिवाजीराव जाधव यांनी मानले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा