महाराष्ट्र
मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळांकरिता स्पर्धा आणि बक्षीस योजना जाहीर...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : गणेशोत्सव 2022 हा कोरोनाची नियमावली शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच सण साजरा होतो आहे.सदरचा उत्सव हा सीना-भीमाच्या खोऱ्यातील मंद्रूप पोलीस ठाणे अंतर्गत येणारे 38 गावातील गणेशोउत्सव तरुण मंडळांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी तसेच सदर उत्साहात मुले,महिला,आबालवृद्ध यांनाही सामावून घेण्यासाठी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळांना बक्षीस जाहीर करण्यात आले आहेत.
गणेशोत्सव दरम्यान समाजोपयोगी असे उत्कृष्ट सामाजिक उपक्रम राबवणारे गणेश मंडळे,गणेशोत्सव मिरवणूकीवेळी पारंपरिक वाद्य वाजवून मिरवणूक काढणारी गणेश मंडळे,गणेशोत्सवा दरम्यान सर्वोत्कृष्ट पर्यावरण पूरक मूर्ती व सजावट करणारी गणेश मंडळे या तिन्ही प्रकारात जी मंडळे सर्वोत्कृष्ट असतील त्या मंडळांना 1,2,3 असे क्रमांक देऊन बक्षीस देण्यात येणार आहे.
वरील तिन्ही विभागात सर्वोत्कृष्ट 1,2,3 गणेश मंडळांना मानाची शाल,श्रीफळ,ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
तसेच ज्या गावांनी एक गाव - एक गणपती हा उपक्रम राबविला आहे.त्या गावांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव संपल्यानंतर सर्व मंडळांना बक्षीस वितरणाची तारिख आणि वेळ पोलीस पाटील यांच्या मार्फत कळवून कार्यक्रम मंद्रूप पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा