लवंगी येथे आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्याकामी सहकार्य करण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी केले आवाहन.. - दैनिक शिवस्वराज्य

लवंगी येथे आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्याकामी सहकार्य करण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी केले आवाहन..


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावच्या शिवारातील भीमा नदी पात्रात शनिवार, दि.२७ आँगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह मंद्रूप पोलिसांना आढळला होता.
      संबंधित अनोळखी पुरुषाचा दोरीने गळा आवळून त्याला भीमा नदीच्या पात्रात टाकून देण्यात आले होते. सदर अनोळखी 35 ते 40 वर्षाच्या पुरुष जातीच्या प्रेताची अद्याप ओळख पटली नसून सीना भीमा खोऱ्यातील सर्व गावातील नागरिकांना , पोलीस पाटलांना , त्यासोबत पंढरपूर मोहोळ मंगळवेढा त्यासोबत कर्नाटकच्या सीमावरती भागातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की, आपल्या उपद्रवी जर अशी व्यक्ती मिसिंग असेल त्यांनी मंद्रूप पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा व सहकार्य करण्याचे आवाहन मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
        यासंदर्भात कोणाकडे काही माहिती उपलब्ध असल्यास त्यांनी तात्काळ मंद्रूप पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील सपोनि रविंद्र मांजरे यांनी केली आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads