महाराष्ट्र
गुंजेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने विशाल पवार यांचा सत्कार व सन्मान...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) ; अहमदनगर महानगरपालिका मुख्य लेखापाल विशाल पवार व रामहरी बलभीम पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून गुंजेगाव साठी जल जीवन मिशन अंतर्गत विहीर, पाण्याची टाकी व पाईपलाईन साठी एक कोटी 31 लाखाचा रुपयेचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल गुंजेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून व उपसरपंच तुकाराम भडकुंबे, तंटामुक्त अध्यक्ष सुभाष पवार ,ज्येष्ठ मार्गदर्शक अंगद पवार, गणपत पवार, किशोर कुलकर्णी, डीएम ग्रुपचे अध्यक्ष विकास पाटील, उत्तम जाधव, रामहरी पाटील, शहाजी पाटील, किसन पाटील यांच्या हस्ते विशाल पवार यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
तसेच याप्रसंगी प्रमुख उपस्थित असलेले कै. भारत नाना भालके यांचे बंधु पंडित नाना भालके यांचा सत्कार ज्ञानेश्वर साळुंखे, महादेव पाटील, मेजर रामचंद्र गोसावी, दत्ता पवार, अमीर शेख, समाधान जाधव, सोमनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डीएम ग्रुपचे अध्यक्ष विकास पाटील यांनी विशाल पवार व पंडित नाना भालके यांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
तसेच यावेळी कुंडलिक जाधव, विष्णू शिवाजी पाटील, समाधान
पवार, चंद्रकांत पाटील, सहदेव पाटील, रणजीत पाटील, जिलानी
मुजावर, माऊली सुतार, ग्रामपंचायत शिपाई शिवाप्पा लोणारी व
ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा