12 सप्टेंबर 2022 रोजी पीएम नॅशनल अप्रेंटीसशिप मेळाव्याचे आयोजन.. - दैनिक शिवस्वराज्य

12 सप्टेंबर 2022 रोजी पीएम नॅशनल अप्रेंटीसशिप मेळाव्याचे आयोजन..


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर : आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत पीएम नॅशनल अप्रेंटीसशिप मेळाव्याचे (PMNAM) आयोजन 12 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता औद्योगीक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर येथे केलेले आहे.
           जिल्ह्यातील सर्व आस्थापना, आयटीआय उत्तीर्ण व अंतीम वर्षे परीक्षा दिलेले सर्व प्रशिक्षणार्थींनी मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. ज्या आस्थापनामध्ये अद्याप शिकाऊ उमेदवारी योजना लागू केलेली नाही. तसेच ज्या आस्थापनांना शिकाऊ उमेदवार भरती करावयाची आहे, अशा सर्व आस्थापनेतील प्रतिनिधींनी अॅप्रेंन्टीस ट्रेनिंग विभागास संपर्क साधावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच प्राचार्य यांनी केले आहे.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads