गणेश विसर्जन शांततेत करण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन.. - दैनिक शिवस्वराज्य

गणेश विसर्जन शांततेत करण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन..


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : यावर्षी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात होत आहे. 9 सप्टेंबर 2022 रोजी अनंत चतुर्दशी असल्याने यादिवशी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. हिप्परगा तलाव 104 टक्के भरला असल्याने गणेश भक्तांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून गणेश विसर्जन शांततेत खाणीमध्ये करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
       जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश भक्त, हिप्परगा ग्रामस्थ, अधिकारी बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त पि.शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांताधिकारी हेमंत निकम, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता एम.टी. जाधवर, सरपंच वैशाली धुमाळ, उपसरपंच रोहन भिंगारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, नगर अभियंता संदीप कारंजे, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह हिप्परगा ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.
     श्री. शंभरकर यांनी सांगितले की, सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील गणेश भक्त हिप्परगा तलाव येथे गणेश मुर्ती आणि निर्माल्य विसर्जनासाठी येतात. तलाव 104 टक्के भरला असून सांडव्यातून पाणी जात आहे. तलावातील पाण्याचा वापर शहर आणि आजूबाजूचे लोक पिण्यासाठी, शेतीसाठी आणि जनावरांसाठी केला जातो. गणेश मुर्ती, निर्माल्याचे विसर्जन केल्यास तलावातील पाणी प्रदूषित होईल. शिवाय यापूर्वी तलावात बुडून अनेक व्यक्तींचा मृत्यू झाल्याने विसर्जनाची सोय तलावाच्या बाजूला असलेल्या खाणीमध्ये करण्यात आली आहे. प्रशासनाकडून गणेश विसर्जन खाणीमध्ये करताना पावित्र्य अबाधित ठेवले जाणार आहे.
      मनपा, पोलीस प्रशासन, पाटबंधारे विभाग, जलसंपदा यांनी विविध सार्वजनिक गणेश मंडळांना विश्वासात घेऊन त्यांना सूचनांची माहिती द्यावी. हिप्परगा तलावाकडे जाणारे रस्ते, विसर्जन करण्यात येणाऱ्या खाणीकडे जाणारे रस्ते याबाबत जलसंपदा विभागाने पोलीस आणि महापालिका यांच्याशी समन्वय ठेवून दिशादर्शक फलक, सूचना फलक जागोजागी लावावेत, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले.
    पोलीस विभागाने गणेश भक्त आणि नागरिकांच्या सोयीसाठी हिप्परगा तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरेगेटस लावण्यात येणार आहेत. 8 सप्टेंबरला सकाळी 10 वाजलेपासून 70 फुट रस्ता, शिवलक्ष्मी मंदिर, तुळजापूर रोडचा बोगदा येथे बॅरेगेटस लावण्यात येणार आहेत. चार चाकी वाहनाला याठिकाणी प्रवेश नसणार आहे. सोलापूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हिप्परगा तलावात गणेश मुर्तींचे विसर्जन न करता खाणीमध्ये करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले आहे.
   सोलापूर शहरात सार्वजनिक गणेश मंडळे 38 असून सर्व मंडळांनी आपल्या गणेश भक्तांना काळजी घेण्याच्या सूचना द्याव्यात. गणपती विसर्जन शांततेत आणि वेळेत करावे. या उत्सवाला कोणतेही गालबोट न लागता करण्याचे आवाहन त्यांनी केले.
         सोलापूर शहरात गणेश विसर्जन करण्यात येणारी ठिकाणे
गणपती घाट, कल्याणी कुंड, कंबर तलाव, (तीन कृत्रिम कुंड), म्हाडा विहीर विडी घरकुल, एमआयडीसी ओपन स्पेस प्रिसिजन फॅक्टरीजवळ (एक कृत्रिम कुंड), रामलिंग नगर विहीर, अशोक चौक, पोलीस मुख्यालय विहीर, मार्कंडेय उद्यान विहीर, विष्णू मिल विहीर, बसवेश्वरनगर विहीर (श्री अक्कलकोटे यांची), सुभाष उद्यान विहीर आणि हिप्परगा येथील खाण.
            गणेश विसर्जनासाठी गणेश मुर्ती याठिकाणी जमा करा
विभागीय कार्यालय क्र. 1
सो.म.पा. शाळा नं. २१ न्यू बुधवार पेठ, वडार गल्ली समाज मंदिर, चंडक शाळा बाळे, जिल्हा परिषद शाळा वारद फॉर्म, प्रसन्न हॉल वसंत विहार, इंदिरा कन्या प्रशाला शिंदे चौक, सो.म.पा. शाळा क्र. ७ चौपाड, सो.म.पा. शाळा क्र. ९ पत्रा तालीम, विठ्ठल मंदिर जुनी पोलीस लाईन, शरदचंद्र पवार प्रशाला उमा नगरी, हुतात्मा स्मृती मंदिर, डॉ.कोटणीस स्मारक भैय्या चौक सोलापूर
विभागीय कार्यालय क्र. 2
रोशन प्रशाला, अंबिका समाज मंदिर राजीव किसान नगर, नागनाथ अल्ली महाराज, पिरॅमिड हॉल बी ग्रुप विडी घरकुल, संभाजीराव शिंदे प्रशाला, राज मेमोरियल इंग्रजी शाळा, जिल्हा परिषद शाळा शेळगी, जोशी गल्ली रविवार पेठ
विभागीय कार्यालय क्र. ३
जय भवानी प्रशाला भवानी पेठ, विभागीय कार्यालय क्र. ३, रविवार पेठ मराठी शाळा क्र. ८ विभागीय कार्यालय क्र. २ जवळ, गांधी नगर नं. २ येथील समाज मंदिर, विनोबा भावे झोपडपट्टी येथील ललीतांबा मंदिर, पावन गणपती कर्णिक नगर, एम.आय.डी.सी.आरोग्यनिरिक्षक ऑफिस,राजेश्वरी शाळा निवारा नगर
विभागीय कार्यालय क्र. ४
मार्कंडेय नगर जिल्हा परिषद शाळा, माधव नगर पद्ममारुती मंदिर, बुर्ला मंगल कार्यालय, गणेश मंदिर बोमडयाल शाळेजवळ, बोल्ली मंगल कार्यालय अशोक चौक, जि. प. शाळा, निलम नगर, सोन गुरजी प्रशाला बत्तुल प्रशाला लगत, मा. सदस्य श्री गुरुशांत धुत्तरगांवकर यांचे संपर्क कार्यालय, केंगनाळकर शाळा
विभागीय कार्यालय क्र. ५
राजस्व नगर सांस्कृतिक भवन, प्रगती लॉन्स, अथर्व मंगल कार्यालय, किल्लेदार मंगल कार्यालय, बालाजी मंगल कार्यालय, गोविंदश्री मंगल कार्यालय,शिवदारे कॉलेज, मातोश्री रखुमाबाई हत्तुरे मंगल कार्यालय, हत्तुरे मंगल कार्यालय, मारुती मंगल कार्यालय, कुसुमराज मंगल कार्यालय, समृध्दी गार्डन, पोस्ट बेसीक शाळा विजापूर रोड, रामलिंग नगर विहीर
विभागीय कार्यालय क्र. ६
सुंदराबाई डागा प्रशाला दमाणी नगर, जि. प. शाळा देगांव, थोबडे वस्ती समाज मंदिर थोबडें वस्ती,जांबमुनी समाज मंदिर सोनी नगर, उत्कर्ष नगर मनपा शाळा, मनपा शाळा क्र.२८ सुंदरम नगर, एक्झिबिशन सेंटर मरिआई चौक
विभागीय कार्यालय क्र. ७
प्र.क्र.१६ मोदी शाळा बिंग बाजार समोर, प्र.क्र.२२ रामवाडी शाळा, मनपा शाळा ३ दक्षिण कसबा, भुई समाज मंदिर शुक्रवार पेठ, प्र.क्र. १५ आंबेडकर शाळा एम्प्लायमेंट चौक (खाजगी), शिवनुभव मंगल (खाजगी)
विभागीय कार्यालय क्र. ८
जोडबसवण्णा चौक शाळा नं.६, पोलिस मुख्यालय लगत एमपीएससी अभ्यास केंद्र, वॉर्ड ऑफिस म्हेत्रे, इन्डोअर स्टेडिअम अश्विनी हॉस्पीटल जवळ, वसंतराव नाईक शाळा, लोधी गल्ली शाळा नं.१४ समाज मंदिर जवळ, सतनाम चौक ललीत कला केंद्र, म. बेकरी शास्त्री नगर समाज मंदिर महादेव मंदिर, ५ नं. शाळा इंदिरा नगर, ७० फुट रोड मस्जीद जवळ समाज मंदिर, शास्त्री नगर तायम्मा मंदिर, जांबमुनी समाज मंदिर अलकुंटे चौक, बापूजी नगर हनुमान मंदिर, गणेश मंदिर हॉल विकास नगर पोस्टल कॉलनी परिसरात, वॉर्ड ऑफिस नल्लामंदु, कॅम्प शाळा, सुभाष उदयान विहीरीलगत, बालाजी मंदिर मुर्गी नाला भाजी मार्केट
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads