महाराष्ट्र
श्री स्वामी समर्थ बाल गणेश तरुण मंडळ कंदलगाव यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव अंतर्गत कंदलगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : श्री स्वामी समर्थ बाल गणेश तरुण मंडळ कंदलगाव यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवात श्री गणेशा ची महापूजा ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ भीमराव जोकारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
तसेच कंदलगाव आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नलावडे मॅडम, खंडाळे सर, के. आर तुप्पे सर , धुळम सर, कांबळे सर, रूद्रार मॅडम, देशमुख सर, नीला मारणूरे मॅडम, लैला शेख मॅडम, सुवर्णा लोहार मॅडम, सविता सोनकटले मॅडम, समीर शेख सर व सर्व आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारीवर्ग यांच्या सहकार्याने आरोग्य शिबीर उत्तम रित्या संपन्न झाली.
या शिबीरात कोविड शिल्ड लसीकरण, किरकोळ आजार उपचार,रक्ताची तपासणी करण्यात आली. या शिबिरात कंदलगाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घेतला.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा