महाराष्ट्र
मंद्रूप पोलीस स्टेशनच्या वतीने उपनिरीक्षक अल्लाबक्ष सय्यद यांचा सेवानिवृत्त निर्मित सत्कार...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : मंद्रूप पोलीस स्टेशन मधील गेले ३८ वर्ष पोलीस खात्यात अविरत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अल्लाबक्ष सय्यद हे दि.३१ ऑगस्ट २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व उपनिरीक्षक अमितकुमार करपे यांनी त्यांना त्यांच्या पोलीस खात्यातील उत्कृष्ट सेवा बजावल्या बद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार केला.
त्यांच्या ३८ वर्षे पोलीस खात्याच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल मंद्रूप पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचे सहकारी उपनिरीक्षक अमितकुमार करपे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी अल्लाबक्ष सय्यद यांच्या कार्याची स्तुति करत त्यांचे कौतुक केले .
सदर कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत पोलीस उपनिरीक्षक सय्यद यांना हाताने धरून स्वतःच्या प्रभारी अधिकारी या खुर्चीवर बसवून त्यांना सर्वोच्च मान दिला. सदर प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक अल्लाबक्ष सय्यद यांनी आपल्या डोळ्यात पाणी आणून आभार व्यक्त केले व हा माझा सर्वोच्च सत्कार करण्यात आला अशी भावना व्यक्त केली सदर कृतीबाबत मंद्रूप पोलिस स्टेशनचे सर्व सहकारी कर्मचारी यांनी टाळ्या वाजवत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे यांचे अभिनंदन केले.
यावेळी सत्कारमूर्ती पोलीस उपनिरीक्षक अल्लाबक्ष सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मी आज उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त होत आहे पण आपल्या पोलीस स्टेशनसाठी कधीच सेवानिवृत्त होणार नाही ज्या ज्या वेळी माझी मंद्रुप पोलीस स्टेशनला गरज आहे तेंव्हा तेंव्हा मी तन मन धन यां सोबत तत्पर असेन म्हणून सर्वांचे मन जिंकले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस हवालदार प्रमोद आसादे यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी सर्वांनी उपनिरीक्षक अल्लाबक्ष सय्यद यांच्या कार्याविषयी गुणगाण सांगितले. एक उत्तम पोलीस, सहकारी आज सेवानिवृत्त होत आहे त्यांची कमी भरुन निघतं नाही तरीही त्यांना भावी जीवनाच्या खुप खुप शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंद्रुप पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह, अंमलदार, पोलीस शिपाई व कर्मचारी उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा