महाराष्ट्र
कंदलगाव ता.द.सोलापूर येथे चाणक्य कॉम्प्युटर्स च्या दुस-या शाखेचा भव्य शुभारंभ संपन्न..
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप): दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे विशाल भारत बंडगर यांच्या चाणक्य कॉम्प्युटर्सची पहिली शाखा 3 एप्रिल 2022 रोजी चालु झाली त्यामध्ये 3 बॅचेस मध्ये 72 विद्याार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन उत्तमरीत्या पास झाले असुन व अजुन बॅचेस चालु आहेत. त्याच अनुषंगानेच त्यांनी कंदलगाव येथे दुसरी शाखा सुरू करण्याचे ठरविले. व त्यांच्या या दुस-या शाखेचा भव्य शुभारंभ सोहळा आर्थिक गुन्हे शाखा उस्मानाबादचे P.I. संतोष शेजाळ व मंद्रूप पोलीस ठाण्याचे A.P.I. रविंद्र मांजरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या चाणक्य कॉम्प्युटर्स चे उद्घाटन प्रमुख उपस्थितीत मान्यवर आर्थिक गुन्हे शाखा उस्मानाबादचे कर्तव्यदक्ष P.I. संतोष शेजाळ व मंद्रूप पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष A.P.I. रविंद्र मांजरे यांच्या हस्ते करण्यात आले.विशाल बंडगर परिवारातर्फे मान्यवरांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.
MS-CIT म्हणजे माहिती तंत्रज्ञानाची (आयटी) साक्षरता प्रदान करणाऱ्या अभ्यासक्रमाची सुरुवात महाराष्ट्रात MKCL कडून सन २००१ मध्ये करण्यात आली. २१ व्या शतकात आयटी साक्षरता प्रदान करणारा हा अभ्यासक्रम संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झालेला आहे. ज्ञानविस्ताराचे अत्यंत परिणामकारक माध्यम म्हणून डिजिटलचे रूप (डिजिटलायझेशन), अनेक प्रकारच्या डिजिटल स्वरूपांच्या सहयोगाने उदयास आले. डिजिटली साठविणे, डिजिटली सादरीकरण, डिजिटली वितरण, डिजिटली प्रवेश (एक्सेस), डिजिटली संग्रहित करणे आणि डिजिटल व्यवस्थापन इत्यादी गोष्टी सुलभ झाल्या. साहजिकच खासगी, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात प्रत्येकाला या सर्व गोष्टी अत्यावश्यक झालेल्या आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागात या कोर्सेस घेणे आवश्यक आहेत.
या कार्यक्रमाप्रसंगी अंत्रोळी गावचे व आर्थिक गुन्हे शाखा उस्मानाबादचे कर्तव्यदक्ष P.I. संतोष शेजाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अंत्रोळी, कंदलगाव सारख्या खेडेगावात कॅम्पुटर कोर्सेस चालु केल्याने विशाल बंडगर याचे त्यांनी कौतुक केले
तसेच मंद्रूप पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष A.P.I. रविंद्र मांजरे म्हणाले की, अंत्रोळी, कंदलगाव सारख्या खेडेगावात कॅम्पुटर कोर्सेस चालु केल्याने विद्यार्थ्यांना चांगला असा ऑप्शन मिळाला असुन कम्पूटर ही काळाची गरज आहे सर्वांनी कम्प्युटर कोर्सेस करणे गरजेचे आहे. लोकांनी व तरुणाई वर्गातील सर्वांनी हा कोर्स करावा असे त्यांनी याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.
या कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थ व विशाल बंडगर परिवार तसेच अंत्रोळी ,कंदलगावातील ग्रामस्थ व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा