महाराष्ट्र
आधाराशी ईकेवायसी लिंक न केल्यास शेक-यांना P.M.किसान हप्ता मिळणार नाहीत ; ७ सप्टेंबर पर्यंत असणार मुदत :- तहसीलदार राजशेखर लिंबारे
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत नोंदणी कृत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी केंद्र शासन स्तरावरून विविध उपयोजना करण्यात येत आहेत. ३१ऑगस्ट २०२२पर्यंत इ. ईकेवायसी प्रक्रिया करून घेण्याविषयी शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही मोठ्या प्रमाणात ही ईकेवायसी झाली नाही. यामुळे मा.मुख्य सचिव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे दिलेल्या सूचने नुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबर पर्यंत आधार क्रमांकला ईकेवायसी करून घ्यावी अन्यथा संबंधित शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाहीत. बारावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी सात सप्टेंबर 2022 पर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी केले.
कृषी विभाग, तलाठी ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दक्षिण तालुक्यातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची बँक खाते पडताळणी केलेल्या आधार क्रमांकाची जोडून घेण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच शेतकऱ्यांनाही ईकेवायसी बाबत मार्गदर्शन करावे. पीएम किसन योजनेअंतर्गत सप्टेंबर 2022 पर्यंत व्यतिरिक्त केले जाणारे हप्ते आधार क्रमांक शी संलग्न केलेल्या बँक खात्यात जमा होणार असल्याने त्यासाठी सात सप्टेंबर 2022 पर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी दक्षिण तालुक्यातील सीएससी सेंटर आपली सेवा केंद्र मध्ये जाऊन किंवा शेतकऱ्याने स्वतःच्या मोबाईलवर ईएकेवायसी करावी केंद्र शासनाच्या धोरणा नुसार योजनेतील लाभार्थ्यांचा डाटा अंतिम व सुनिश्चित करण्याची कार्यवाही विविध कालमर्यादित पूर्ण करायचे आहे.
सर्व पात्र शेतकरी योजनेच्या लाभार पासून वंचित राहणार नाहीत. याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी तसेच शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन आपल्या गावातील किंवा जवळच्या सीएससी सेंटर आपले सेवा केंद्र किंवा स्वतःच्या मोबाईल वरही केवायसी करावी असे आवाहनही तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी केली आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा