पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगर मेळाव्यात 240 उमेदवारांची निवड.. - दैनिक शिवस्वराज्य

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगर मेळाव्यात 240 उमेदवारांची निवड..


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापुर : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, सोलापूर आणि रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय व गुरुप्रसाद कॉम्प्युटर्स पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक 18 ऑक्टोबर, 2022 रोजी “कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर मेळाव्यात 240 उमेदवारांची उद्योजकांमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे प्राथमिक निवड करण्यात आली. असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहा. आयुक्त सचिन जाधव यांनी सांगितले.

रोजगार मेळाव्यात 555 नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदवला होता.या मेळाव्यात औद्योगिक परिसरातील एकूण 15 नामांकित उद्योजकांकडून एकूण 3 हजार 636 पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आलेली होती. ही सर्व रिक्तपदे किमान 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, जीएनएम, बी.एस.सी, स्टाप नर्स, बी.फार्म, एम. फार्म, एम.बी.ए. केमिस्ट इत्यादी विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी जिल्हयातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या असेही, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहा. आयुक्त जाधव यांनी सांगितले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads