महाराष्ट्र
ऑटोरिक्षाचे मीटर पुन:प्रमाणीकरणासाठी 01 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ..
समीर शेख प्रतिनिधी
सोलापुर : ऑटोरिक्षांचे मीटर पुन:प्रमाणीकरण ( Meter Calibration) करणेबाबत दिनांक 18 जुलै 2022 पासून 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत (90 दिवस) मुदत देण्यात आली होती. तथापि दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी ऑटोरिक्षांचे मीटर पुन:प्रमाणीकरण मुदत संपत असल्याने ज्या ऑटोरिक्षा परवानाधारकांनी ऑटोरिक्षांचे मीटर पुनः प्रमाणीकरण (Meter Calibration) केलेले नाही त्यांचेकरिता दिनांक 01 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदत वाढविण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.
ऑटोरिक्षांची सुधारित भाडेवाढ दिनांक 18 जुलै 2022 पासून लागू झालेली आहे. ऑटोरिक्षाकरिता पहिल्या 1.5 कि.मी. करिता किमान देय भाडे 23 रुपये व त्यापुढील प्रत्येक किलो मीटरसाठी किमान देय भाडे 15 रुपये आहे. जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालक तसेच मालक यांनी विहीत मुदतीत ऑटोरिक्षांचे मीटर पुन:प्रमाणीकरण ( Meter Calibration) करुन घ्यावे असे आवाहनही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा