महाराष्ट्र
गंगेवाडीच्या सरपंचाच्या भ्रष्ट कारभाराची त्वरित चौकशी करुन कारवाई करावी ; सामाजिक कार्यकर्ते शिलवंत चौगुले यांची मागणी
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील जागेमध्ये ग्रामपंपचायत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी १०१ प्लॉट पाडून अनाधिकृतपणे प्लॉटची विक्री केली.गंगेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जागेमध्ये अतिक्रमण करुन बेकायदेशीर प्लाॅटची विक्री केली.तसेच ग्रामपंचायत गंगेवाडी येथे दोन वाचनालये असून त्यापैकी एका वाचनालयात गंगेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व त्यांचे पती स्वतःचे घर समजून तेथे आपल्या कुटूंबियासह वास्तव्य करतात,तर दुसरे वाचनालय कायस्वरुपी बंद असून देखील त्याचे शासकिय अनुदान लाटले जाते.सदरच्या वाचनालयाची जागा ही अतिक्रमण केलेल्या जागेत आहे. गावातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून विद्यार्थ्यांना शाळेसाठी चार किलोमीटर लांब अंतरापर्यंत खड्यामधूण चालत जावे लागते याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होतो.या खड्डांमुळे मागील दीड ते दोन वर्षांपासून एसटी देखील गावात येत नाहीय.त्यामुळे विद्यार्थ्यांना या गोष्टीचा हा त्रास होत असताना सरपंच व अन्य सदस्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
सदरच्या भ्रष्टाचाराबाबत प्रशासनास वारंवार निवेदने देऊन,उपोषण करुन तसेच प्रतिज्ञापत्र देखील सादर केलेले असून राजकीय दबावापोटी प्रशासन या बाबीकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गंगेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते शिलवंत चौगुले आणि अर्जून जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
याप्रकरणाची लवकरात लवकर चौकशी होऊन संबंधीतावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा