जकराया शुगर लि. वटवटे साखर कारखान्याच्या 12 व्या गळित हंगामाचा शुभारंभ.. - दैनिक शिवस्वराज्य

जकराया शुगर लि. वटवटे साखर कारखान्याच्या 12 व्या गळित हंगामाचा शुभारंभ..


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : जकराया शुगर लि. वटवटे, ता. मोहोळ, जि. सोलापूर या कारखान्याचा सन २०२२-२०२३ या 12 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मोळी पुजन कार्यक्रमाचे आज सोमवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कारखान्याचे संस्थापक, चेअरमन अॅड. बिराप्पा भगवान जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व पुर्ण वेळ संचालक राहुल बिरप्पा जाधव,कार्यकारी संचालक सचिन बिराप्पा जाधव व जकराया देवस्थानचे पुजारी व सभासद,ऊस उत्पादक व शेतकरी बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला .
    यावेळी शुगरचे संस्थापक, चेअरमन अॅड. बिराप्पा भगवान जाधव  यांनी शेतकऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.
    जकराया शुगर लि. वटवटे, ता. मोहोळ, जि. सोलापूर हा साखर कारखाना सोलापुर जिल्ह्यातील अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जात आहे. या कारखान्याचे संस्थापक, चेअरमन अॅड. बिराप्पा भगवान जाधव यांची कडवी शिस्त, काटकसर, पारदर्शकता व उत्कृष्ट व्यवस्थापन आणि त्यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे या साखर कारखान्याने सोलापूर जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे. 
   या कार्यक्रमासाठी जकराया शुगर लिमिटेड चे संस्थापक चेअरमन अॅड. बिराप्पा भगवान जाधव यांच्यासह संचालक राहुल बिराप्पा जाधव,कार्यकारी संचालक सचिन बिराप्पा जाधव व विजय महाजन , मल्टीस्टेट सीईओ मनीषा जाधव मॅडम यांच्यासह अंत्रोळी, गावडेवाडी, अकोले, मंद्रूप, मनगोळी ,वांगी, कंदलगाव, भंडारकवठे, कुसुर, वडापूर, विंचूर तसेच मोहोळ तालुक्यातील वाघोली येथील शेतकरी सभासद सर्व सभासद,ऊस उत्पादक व शेतकरी बांधव व जकराया शुगर व जकराया मल्टीस्टेट को. चे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads