संगमेश्वर कॉलेज मध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहत साजरा.. - दैनिक शिवस्वराज्य

संगमेश्वर कॉलेज मध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहत साजरा..


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर ; संगमेश्वर कॉलेज, सोलापूर (स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित वाचन प्रेरणा दिवस व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.  
       डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे विचार आचरणात आणावे, विद्यार्थ्यांनी सातत्याने वाचन करावे, महाविद्यालयातील वेगवेगळ्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे , विद्यार्थ्यांनि शिकण्याची क्षमता वाढवावी असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व व्याख्याते प्रा. डॉ. शहानुर शेख सर (रसायनशास्त्र विभाग,संगमेश्वर कॉलेज) यांनी केले.          मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.डॉ. ए व्ही साखरे सर यांनी प्रास्ताविक केले. श्रीलेखा ढालगे, प्रतीक्षा कटारे, स्नेहल साबणे, अमोल मिरेकर, वैष्णवी सुतार या विद्यार्थ्यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन आणि शिक्षण त्यानी लिहिलेली पुस्तके त्यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान या सर्व गोष्टी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
    विद्यार्थ्याच्या जीवनात पुस्तके हे खरे मित्र असतात,अतिरिक्त माहिती मिळवण्यात आणि तुमचे ज्ञान वाढविण्यात पुस्तकांची मदत होते, पुस्तके जीवनाला योग्य दिशेने आकार देतात असे मनोगत प्रा. डॉ. संतोष मेटकरी सर यांनी केले. 
 प्रा. डॉ. विजयकुमार मुलीमणी सर,( संचालक, ज्ञान संशोधन केंद्र) यांनी ग्रंथालयातील उपक्रम, वाचनालयातील नियतकालिके, जर्नल्स, अभ्यासक्रम पुस्तके,महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका योजना, ई-लायब्ररी व ग्रंथालयातील इतर संसाधने इत्यादी बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन (एन.एस.एस स्वयंसेवक) चि.मनोज घोरपडे याने केले तर कु.अनिता हगरगी (एन.एस.एस स्वयंसेविका) यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापिका, व कर्मचारी बहूसंखेने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads