खासगी प्रवासी वाहनांनी प्रवाशांकडून जादाची आकारणी करु नये ; उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांचे आवाहन - दैनिक शिवस्वराज्य

खासगी प्रवासी वाहनांनी प्रवाशांकडून जादाची आकारणी करु नये ; उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांचे आवाहन


समीर शेख प्रतिनिधी
 सोलापूर :- खासगी प्रवासी वाहनांनी गर्दी हंगामाच्या काळात प्रवाशांकडून जादाची भाडे आकारणी करु नये. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ठरविलेल्या प्रत्येक किलोमिटर भाडे दराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आवाहन उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

राज्य शासनाने 27 एप्रिल 2018 रोजी खासगी प्रवाशी वाहनांसाठी कमाल भाडेदराचा निर्णय जारी केला आहे. खासगी बस मालकांनी महत्तम भाडे बाबतचा विहित नमुन्यात तत्का तयार करुन व त्या प्रमाणे येणारा प्रती आसन दर दर्शवून सदर खासगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिध्द करण्यात यावेत तसेच खासगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केली जात असल्यास कार्यालयाच्या mh13@mahatranscom.in या ई-मेल आयडी वर प्रवाशांनी तक्रार नोंदवावी असे आवाहनही उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads