Job Alert | राज्यातील पोलीस दलात 'या' पदांसाठी लवकरच सुरू होणार भरती प्रक्रिया
टीम महाराष्ट्र देशा: राज्यात एकीकडे बेरोजगारी बद्दल बोलले जात असताना दुसरीकडे महाराष्ट्र पोलीस दल विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. या पदांमध्ये शिपाई आणि चालक पदांच्या एकूण 17130 रिक्त जागा आहे.
या पोलीस भरतीची जाहिरात दिनांक 1 नोव्हेंबर 2022 रोजीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्यातील पोलीस दलाच्या या भरती प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातील विविध पोलीस आयुक्त कार्यालयांचा समावेश आहे. यामध्ये बृहन्मुंबई, ठाणे शहर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड,मीरा भाईंदर, नागपूर शहर, नवी मुंबई, अमरावती शहर, सोलापूर शहर, लोहमार्ग मुंबई आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, ठाणे ग्रामीण, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक ग्रामीण, अहमदनगर, धुळे, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सोलापूर ग्रामीण, औरंगाबाद ग्रामीण, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर ग्रामीण, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती ग्रामीण, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, पुणे लोहमार्ग औरंगाबाद लोहमार्ग या पोलीस आयुक्त कार्यालयांचा समावेश आहे. पोलीस दलातील या बंपर भरतीसाठी 3 नोव्हेंबर 2022 पासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. तर या पदासाठी इच्छुक उमेदवार 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतील.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा