Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान, भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये भरती सुरू, असा करा अर्ज
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि साधू वासवानी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज पुणे या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती सविस्तरपणे,
राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे
एकूण 280 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - सुपर स्पेशालिस्ट, दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल फिकॉलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, आहारतज्ञ, समुपदेशक, मानसोपचार परिचारिका, लेखापाल, MTS, तंत्रज्ञ आणि इतर पदे
शैक्षणिक पात्रता - DM/ MD/ BDS/ MBBS/ BAMS/ BUMS/ BHMS/ MCA/ MA/ BCA/ MSW/ GNM/ B.Sc.(नर्सिंग)/पदवीधर/ १०वी/ ITI/ १२वी/ DMLT (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
एकूण जागा - 280
अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, चौथा मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 21 नोव्हेंबर 2022
तपशील - arogya.maharashtra.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Advertisement for Various district level post under National Health Mission in Thane या लिंकवर क्लिक करा. document लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई
पोस्ट - वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक
एकूण जागा - 55
नोकरीचं ठिकाण - मुंबई
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट -www.aai.aero
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा