महाराष्ट्र
प्रति थेंब अधिक पीक योजनेसाठी 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक पीक या योजनेसाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेण्यासाठी दिनांक 15 ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीत करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.
अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ यासाठी कृषि विभागामार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी ठिबक व तुषार सिंचन संचाचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्यासाठी कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित गावचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा