पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन... - दैनिक शिवस्वराज्य

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत सन 2022-23 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेंतर्गत भाजीपाला रोपवाटिका योजनेसाठी जिल्ह्यास भौतिक 46 व आर्थिक रक्कम 127.88 लाख लक्षांक प्राप्त झाले आहे. रोपवाटिका प्रकल्प उभारणीसाठी मूल्य रक्कम रु. 5.55 लाख ग्राह्य धरुन रक्कम रु. 2 लाख 77 हजार 500 (50 टक्के याप्रमाणे) अनुदान अनुज्ञेय आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

 या योजनेचे लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची 0.40 हेक्टर जमीन व रोपवाटिका उभारणीसाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे. महिला कृषि पदवीधारकांना प्रथम प्राधान्य राहील. महिला गट व महिला शेतकरी द्वितीय प्राधान्य राहील. तसेच भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहील. टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका उभारणी करणे आवश्यक आहे.

तसेच अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads