महाराष्ट्र
हॉटेल,धाब्यावरती विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या हॉटेल चालकांना स्थानिक गुन्हे शाखेचा दणका ; 32,610 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर: दि.14 नोव्हेंबर रोजी करमाळा उपविभागात करमाळा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे आरोपी सिद्धेश्वर बळीराम तोरमल याच्या ताब्यातून देशी विदेशी दारूच्या बाटल्या साहित्य असे एकूण 3360/- रु. किंमतीच्या माल जप्त करण्यात आला. आरोपी श्रीकृष्ण नागनाथ चौधरी याच्या ताब्यातून देशी विदेशी दारूच्या बाटल्या साहित्य असे एकूण 7295/- रु. किंमतीच्या माल जप्त करण्यात आला. आरोपी बाबु मुलाणी याच्या ताब्यातूनदेशी विदेशी दारूच्या बाटल्या साहित्य असे एकूण 5940/- रु. किंमतीच्या माल जप्त करण्यात आला. आरोपी वसंत ढवळे याच्या ताब्यातूनदेशी विदेशी दारूच्या बाटल्या साहित्य असे एकूण 16015/- रु. किंमतीचा माल जप्त करण्यात आला. असे एकुण 32,610/- रु किंमतीच्या देशी विदेशी दारू बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या चौघा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे , अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, ग्रेड .पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड ,पोलीस हवालदार हरिदास पांढरे, पोलीस नाईक गणेश बांगर,पोलीस काॅस्टेबल विनायक घोरपडे,चालक पोलीस काॅस्टेबल राजु गवेकर यांनी केली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा