महाराष्ट्र
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंत्रोळीची एक सुवर्णमय कामगिरी ; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी पटकाविले सुवर्णपदक ...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दिनांक 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेत मुलांच्या गटात चि. स्वप्निल नाथाजी केंगार तर मुलींच्या गटात कु. प्राची संजय आठवले यांनी सुवर्णपदक पटकावत अंत्रोळी जिल्हा परिषद शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर टाकली आहे.या स्पर्धा महात्मा गांधी संकुल ऐरोली नवी मुंबई येथे संपन्न झाल्या. महाराष्ट्र संघाकडून खेळताना या दोन्ही खेळाडूनी अष्टपैलू खेळ करीत सुवर्णपदक पटकाविले सातत्यपूर्ण सराव व तंत्रशुद्ध शैलीच्या जोरावर राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा व दिल्लीच्या संघाचा पराभव करीत महाराष्ट्राचा झेंडा देशात फडकविला.या यशस्वी खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक श्री तुळशीराम शेतसंधी व श्री श्रीकांत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडूंचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, कंदलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आमसिध्द बिराजदार, मुख्याध्यापक सिद्धारूढ मुंदिनकेरी, शिक्षक गौरप्पा बन्ने, नागेश गायकवाड, सखुबाई गुंड, कस्तुरा घाडगे, साहेबजादी अत्तार, कीर्ती जाधव व सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले. त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा