अवैध सुगंधित तंबाखू व सुपारी बाळगणाऱ्यांवर मंद्रूप पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई ; एकूण 62,170 रुपयाचा मुद्देमाल जप्त - दैनिक शिवस्वराज्य

अवैध सुगंधित तंबाखू व सुपारी बाळगणाऱ्यांवर मंद्रूप पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई ; एकूण 62,170 रुपयाचा मुद्देमाल जप्त


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : माळकवठे ता.द.सोलापुर येथे एक इसम मशीनसह अवैध सुगंधित तंबाखू व सुपारी बाळगुन विक्रीकारिता बंदी असलेला मावा बनवत असलेबाबतची माहिती मंद्रूप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ ग्रेड पोलीस उपनिरीक्षक ढवळे, पोलीस हवालदार गुंडाळे पोलीस शिपाई काळे यांना बातमीच्या ठिकाणी पाठवून तेथील सर्व मुद्देमाल मशीनसह ताब्यात घेतला. ह्या बाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी यांना कळविले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी यांनी मंद्रुप पोलीस स्टेशन येथे येऊन पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुद्देमालाची पाहणी करून मंद्रुप पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली आहे. 
 सविस्तर माहिती अशी की ,
 दिनांक 3 नोव्हेंबर रोजी माळकवठे, तालुका दक्षिण सोलापूर येथे आरोपी सिकंदर उस्मान नदाफ वय वर्षे 28 राहणार माळकवठे तालुका दक्षिण सोलापूर यांने आपल्या ताब्यात D.P. मावा 150 पुड्या, तुकडा सुपारी एकुण 100 किलो, सुगंधित तंबाखू 20 किलो, सुगंधित तंबाखू 20 किलो ,मोठी चिप्स सुपारी 12 किलो ,15 किलो चुना ,मावा बनविण्याचे मशीन, इलेट्रिक वजन काटा,असा असा एकूण 62,170 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात स्वतःजवळ बाळगून महाराष्ट्र राज्यात सुगंधी तंबायुक्त मावा, तत्सम अन्नपदार्थाची विक्री,साठा, उत्पादन बंदी चे आदेश असताना वरील मुद्देमालसह मिळून आला आहे.
     म्हणुन त्याच्याविरुद्ध मंद्रूप पोलीस ठाण्यात भा द वि कलम 328,188, 272,273, अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 कलम 26(2)(i),26(2)(ii),26(2)(iv),27(3)(e),30(2)(a),प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.       
    अधिक तपास मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुंडाळे हे करीत आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads