महाराष्ट्र
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंत्रोळी येथील दोन खेळाडूंची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड.
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर ( मंद्रूप) : मुंबई येथे दिनांक 11 ते 13 नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेसाठी जि. प .शाळा अंत्रोळीच्या कुमारी प्राची संजय आठवले व चि. स्वप्निल नाथाजी केंगार या दोन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. या स्पर्धा महात्मा गांधी संकुल ऐरोली, नवी मुंबई येथे संपन्न होणार आहे.
दिनांक 24 व 25 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेत अष्टपैलू व दमदार खेळाचे प्रदर्शन करीत या दोन्ही खेळाडूंनी महाराष्ट्र राज्य संघात स्थान मिळवित जि. प. शाळा अंत्रोळीच्या क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरीत आणखी एक मानाचे स्थान पटकाविले आहे. या खेळाडूंना तुळशीराम शेतसंदी व श्रीकांत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे , केंद्रप्रमुख आमसिद्ध बिराजदार , मुख्याध्यापक मुंदिनकेरी सर ,आनंदकुमार अंत्रोळीकर, सरपंच कोमल करपे ,उपसरपंच सोनाली खरात ,युनूस शेख, बापू शेख, करण कांबळे ,ब्रह्मदेव सलगरे, बाबासाहेब बंडगर ,नबीलाल शेख ,नाताजी केंगार , मजनुद्दीन पठाण, राजकुमार कोळी ,पत्रकार समीर शेख, गोविंद कोळी ,भाऊराया बेलदार ,जितेंद्र थोरात ,अहमद शेख ,प्रकाश कोकरे, प्रमोद झेंडे ,शिवाजी थोरात ,मज्जिद शेख ,नेताजी थोरात शाळेतील सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा