BHEL Recruitment 2022: इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा आणि पदवी असणाऱ्यांना नोकरीची संधी, 78 हजार रुपये पगार - दैनिक शिवस्वराज्य

BHEL Recruitment 2022: इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा आणि पदवी असणाऱ्यांना नोकरीची संधी, 78 हजार रुपये पगार

Engineering Jobs : इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा अथवा पदवी असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHEL) येथे प्रोजेक्ट इंजिनियर (Project Engineer) आणि प्रोजेक्ट सुपरवायजर (Project Supervisor) या पदांवर भरती निघाली आहे.

जे उमेदवार येथे अर्ज करण्यास इच्छूक आणि पात्र आहेत, ते अर्ज करु शकतात. (BHEL Recruitment 2022) पात्र उमेदवार careers.bhel.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर इतकी आहे.

BHEL Vacancy 2022 येथे निघालेल्या जागांसदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.. निवड झालेल्या उमेदवाराला 78 हजार रुपयांपर्यंतचं वेतन मिळणार आहे.

प्रोजेक्ट इंजीनियर
(मॅकेनिकल)- 2 जागा
(इलेक्ट्रिकल)- 7 जागा
(इलेक्ट्रॉनिक्स)- 5 जागा

प्रोजेक्ट सुपरवायजर
(मॅकेनिकल)- 4 जागा
(इलेक्ट्रिकल)- 7 जागा
(इलेक्ट्रॉनिक्स)- 5 जागा

महत्वपूर्ण तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख- 25 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची अखेरची तारीख - 15 नोव्हेंबर 2022

वयाची अट काय?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 32 वर्षांपर्यंत असावं. आरक्षित वर्गासाठी यामध्ये नियमांनुसार सूट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी careers.bhel.in या संकेतस्थळाला भेट द्या...

शैक्षणिक पात्रता काय आहे?
प्रोजेक्ट इंजीनियर पदासाठी (BHEL Project Engineering Recruitment 2022) अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात 60 टक्के गुणांसह बीटेकची पदवी असावी. प्रोजेक्ट सुपरवायजर पदासाठी अर्ज करणाऱ्या (BHEL Project supervisor Recruitment 2022) उमेदवाराकडे मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात डिप्लोमा झालेला गरजेचा.

पगार किती?
प्रोजेक्ट इंजीनियर आणि प्रोजेक्ट सुपरवायजर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 43,550 रुपयांपासून ते 78,000 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads