India Post Jobs 2022 : टपाल विभागात 98 हजारांहून अधिक पदांसाठी भरती; दहावी, बारावी झालेल्यांसाठी नोकरीची संधी - दैनिक शिवस्वराज्य

India Post Jobs 2022 : टपाल विभागात 98 हजारांहून अधिक पदांसाठी भरती; दहावी, बारावी झालेल्यांसाठी नोकरीची संधी

भारतीय टपाल विभागात 98 हजारांहून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. भारतीय टपाल विभागाने अधिकृत इंडिया पोस्ट वेब पोर्टलवर पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 98083 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. याभरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही पण डिसेंबर महिन्यापर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यावा.

India Post Recruitment 2022 : रिक्त जागांचा तपशील

एकूण रिक्त पदे - 98083

  • पोस्टमन - 59,099
  • मेलगार्ड - 1,445
  • मल्टी-टास्किंग (MTS) - 37,539

23 सर्कलमध्ये भरती

भारतीय टपाल विभागात एकूण 98 हजार 83 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. दहावी आणि बारावी पास उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे. पोस्ट ऑफिसमधील भरती अंतर्गत एकूण 23 सर्कलमधील रिक्त जागांवर भरती केली जाते. उमेदवार त्यांच्या राज्य किंवा मंडळानुसार ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

India Post Office Recruitment 2022 : वयोमर्यादा ( Age Limit )

पोस्टमन, मेलगार्ड आणि मस्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 32 वर्ष या दरम्यान असावे. SC, ST, OBC, PWD आणि PH उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

श्रेणींसाठी सवलती

  • SC/ST - 5 वर्ष सवलत
  • ओबीसी - 3 वर्ष सवलत
  • इडब्ल्युसी - एनए, पीडब्ल्युसाठी 10 वर्ष सवलत
  • पीडब्ल्यूडी एससी/एसटी - 15 वर्ष सवलत

India Post Office Recruitment 2022 : शैक्षणिक पात्रता ( Eligibility )

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण उमेदवार या भरती अंतर्गत अर्ज करू शकतात. उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

India Post Office Recruitment 2022 :अर्जाचे शुल्क

या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराला 100 रुपये शुल्क भरावे लागेल.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads