महाराष्ट्र
समीर शेख प्रतिनिधी
भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी दक्षिण सोलापूरचे कार्यकर्ते अकोल्याकडे रवाना....
सोलापूर (मंद्रूप) : गेल्या दोन महिन्यांपासून देशांमध्ये कांग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची ऐतिहासिक भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये आली आहे.यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता प्रत्येक युवकांमध्ये या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी कुतुहल निर्माण होत आहे.सोलापूर जिल्ह्यासाठी अकोला जिल्हा दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कांग्रेस कार्यकर्ते व इतर सम विचारी पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने अकोल्याकडे जाताना दिसत आहेत.
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पाटोळे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा प्रणितीताई शिंदे जिल्हा अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील, तालुका अध्यक्ष हरिश पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस अनंत म्हेत्रे, जिल्हा सचिव महमद शेख, यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होताना तालुका उपाध्यक्ष अमीर शेख,मोलाली शेख यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा