UPSC Recruitment: 12वी पास आहात ना? मग मिळेल थेट सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी; लगेच करा अर्ज
मुंबई, 15 नोव्हेंबर: आजही खासगी नोकरीच्या तुलनेत सरकारी नोकरीला जास्त प्राधान्य दिलं जातं. कारण, सरकारी नोकरीमुळे स्थैर्य आणि आर्थिक बाबींची शाश्वती मिळते, असं म्हटलं जातं.
त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या मोठी असते. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज मागवले आहेत. सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणारे उमेदवार यूपीएससीच्या upsc.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
9 नोव्हेंबर 2022 पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवार 29 नोव्हेंबर 2022 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. स्टेनोग्राफर पदाच्या भरतीसाठी पात्रतेचे तपशील तपासण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीचा वापर करावा.
MPSC Recruitment: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी घोषणा; अधिकारी पदांच्या 1-2 नव्हे 623 जागांसाठी भरती; करा अर्जयूपीएससी वन टाइम रजिस्ट्रेशन स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करताना रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ज्या अर्जदारांनी अद्याप वन टाइम रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली नसेल, त्यांनी आयोगाच्या वेबसाइटला भेट दिली पाहिजे. त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन लिंक उपलब्ध आहे. नोंदणी केल्यानंतर स्टेनोग्राफर परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करता येईल.
अर्ज भरण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो स्टेप 1 : सर्वांत अगोदर यूपीएससीच्या upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. स्टेप 2 : होम पेजवर असलेल्या यूपीएससी स्टेनोग्राफर अॅप्लिकेशन लिंकवर क्लिक करा. स्टेप 3 : तुम्ही नवीन युझर असलात, तर अगोदर रजिस्ट्रेशन करा. स्टेप 4 : रजिस्ट्रेशन केल्यानंतर जनरेट झालेल्या क्रेडेन्शिअल्सच्या मदतीने लॉग इन करा.
स्टेप 5 : अॅप्लिकेशन फॉर्म भरा आणि आवश्यक असलेली कागदपत्रं अपलोड करा. स्टेप 6 : अॅप्लिकेशन फी जमा करा. स्टेप 7 : तुमचा अॅप्लिकेशन फॉर्म जमा होईल. भविष्यातल्या संदर्भासाठी कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट काढा.
Maharashtra Police Bharti: 90 मिनिटांत ठरणार तरुणांचं भविष्य; 18,000 पदांसाठी असं असेल परीक्षेचं पॅटर्नऑफलाइन अर्जदेखील पाठवावा लागेल उमेदवारांनी अॅप्लिकेशनची प्रिंट आउट संबंधित विभाग/कार्यालयाच्या प्रमुखांनी प्रमाणित केलेली प्रत अंडर सेक्रेटरी (E-VI), केंद्रीय लोकसेवा आयोग, ढोलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली 110069 या पत्त्यावर पाठवणं आवश्यक आहे. ऑफलाइन अॅप्लिकेशन 15 डिसेंबर 2022 पर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात पोहोचलं पाहिजे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने ही स्टेनोग्राफर भरती विविध विभागांतर्गत विविध श्रेणी आणि पदांसाठी आयोजित केली आहे. पदांनुसार पात्रता निकष आणि अनुभवाचे निकष बदलतात. ती माहिती अधिकृत वेबसाइटवर मिळू शकेल.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा