महाराष्ट्र
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा इंगळगी येथील शिष्यवृत्ती पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजी बालदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा इंगळगी तालुका दक्षिण सोलापूर येथील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
शालेय व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत समिती,पालक व जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा इंगळगी यांच्या कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतर्फे विद्यार्थ्याना ट्रॉफी, व्यवस्थापन समिती तर्फे रोख पारितोषिक आणि शैक्षणिक साहित्य देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या अंजली राठोड मॅडम यांचा ही ट्रॉफी व शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक शरणप्पा कोळी सर, श्रीरंग बनसोडे सर, श्रीकांत बिराजदार सर, सुजाता खेडगीकर मॅडम, सुनीता राठोड मॅडम, प्रमिला जळगोडर मॅडम, तसेच व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरख माळी, गावचे सरपंच श्री.वळसंगे, व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक,पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थांना शुभेच्छा देऊन कौतुक केले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा