Job Majha : इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थामध्ये मेगा भरती सुरू, असा करा अर्ज - दैनिक शिवस्वराज्य

Job Majha : इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थामध्ये मेगा भरती सुरू, असा करा अर्ज

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. 

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाईड न्यूट्रिशन, मुंबई

पोस्ट - सहाय्यक व्याख्याता सह सहाय्यक प्रशिक्षक, निम्न विभाग लिपिक, शिक्षक सहयोगी

  • शैक्षणिक पात्रता - पदव्युत्त पदवी, MBA, 12 वी पास, टायपिंगचा वेग 40 श.प्र.मि. (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
  • एकूण जागा - 21
  • नोकरीचं ठिकाण - मुंबई
  • ऑफलाईन पद्धतीने तु्म्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्रिन्सिपल, हॉटेल मॅनेजमेंट संस्था, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाईड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई- 400028
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 नोव्हेंबर 2022
  • तपशील - www.ihmctan.edu (या वेबसाईटवर गेल्यावर संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. हिंदी, इंग्रजी दोन्ही भाषेत जाहिरात आहे. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी

पोस्ट - यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल-II, प्रशासकीय सहायक

  • शैक्षणिक पात्रता - यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल-II साठी पदव्युत्तर पदवी, प्रशासकीय सहायक पदासाठी पदवीधर ही पात्रता हवी.
  • एकूण जागा - 09
  • वयोमर्यादा - 38 वर्षांपर्यंत
  • नोकरीचं ठिकाण - रत्नागिरी
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - NAHEP - IDP कार्यालय, DBSKKV, दापोली
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022
  • तपशील - www.dbskkv.org (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये read more वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, मुंबई

पोस्ट - गेस्ट फॅकल्टी

  • शैक्षणिक पात्रता - डिग्री / डिप्लोमा
  • एकूण जागा - 17
  • नोकरीचं ठिकाण - मुंबई
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट - www.nstimumbai.dgt.gov.in
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads