Job Majha : दहावी-बारावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, कोचीन शिपयार्ड आणि युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर भरती - दैनिक शिवस्वराज्य

Job Majha : दहावी-बारावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, कोचीन शिपयार्ड आणि युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर भरती

Job Majha : दहावी आणि बारावी पास झालेल्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे. कोचीन शिपयार्ड ( Cochin Shipyard ), टाटा मेमोरियल सेंटर मुंबई आणि युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (Uranium Corporation of India) विविध पदांवर भरती जाहीर झाली आहे.

पात्र उमेदवारांनी या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

कोचीन शिपयार्ड लि.

पोस्ट : अप्रेंटिस (यात पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन- डिप्लोमा अप्रेंटिस )

शैक्षणिक पात्रता : पदवीधर अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंगमध्ये पदवी आणि टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा

Reels

एकूण जागा : 143

वयोमर्यादा : 18 वर्ष पूर्ण

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 डिसेंबर 2022

तपशील : https://cochinshipyard.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. NOTIFICATION FOR ENGAGEMENT OF GRADUATE/TECHNICIAN (DIPLOMA) APPRENTICES UNDER APPRENTICES (AMENDMENT) ACT 1973 या लिंकवर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची notification दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (UCIL)

पोस्ट : अप्रेंटिस (यात फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल, सुतार, प्लंबर यांचा समावेश आहे.)

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI

एकूण जागा : 239

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022

तपशील : ucil.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर jobs वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई

पोस्ट : डेटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता : 12 वी पास, संगणकाचा किमान ६ महिन्यांचा कोर्स किंवा MS-CIT प्रमाणपत्र, १ वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 4

नोकरीचं ठिकाण : मुंबई

थेट मुलाखतीतून निवड होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता : रुम नं. 205, दुसरा मजला, सेंटर फॉर कॅन्सर एपीडिमिओलॉजी, अॅडवान्स सेंटर फॉर ट्रिटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर, सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई - ४१०२१०

मुलाखतीची तारीख : 21 नोव्हेंबर 2022

तपशील - www.actrec.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. advertisement number - CCE/Advt/1031/2022 यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads