सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक धोंडिराम अर्जुन यांची पदोन्नतीवर मंत्रालयात बदली ; जिल्हा माहिती कार्यालय, पत्रकारांकडून निरोप - दैनिक शिवस्वराज्य

सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक धोंडिराम अर्जुन यांची पदोन्नतीवर मंत्रालयात बदली ; जिल्हा माहिती कार्यालय, पत्रकारांकडून निरोप


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर,दि.11  : सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहायक धोंडिराम अर्जुन यांची पदोन्नतीवर सहायक संचालक म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, वृत्त शाखा, मंत्रालय मुंबई येथे बदली झाली आहे. आज त्यांना जिल्हा माहिती कार्यालय आणि पत्रकारांकडून निरोप देण्यात आला.
   जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देवून श्री. अर्जुन यांना निरोप दिला. ते सोमवारी मंत्रालयात रूजू होणार आहेत. यावेळी वरिष्ठ लिपीक शरद नलवडे, लिपीक अमित खडतरे, वाहनचालक भाऊसाहेब चोरमले, अनिल नलवडे, निवृत्त रेनिओ ऑपरेटर इक्बाल भाईजान, कर्मचारी संघटनेचे रघुनाथ बनसोडे उपस्थित होते. यावेळी श्रीमती बीडकर आणि कर्मचारी, पत्रकार यांनी श्री. अर्जुन यांना शुभेच्छा दिल्या.
   धोंडिराम अर्जुन यांनी यापूर्वी मंत्रालय मुंबई येथे प्रतिवेदक, उपसंपादक म्हणून कामकाज पाहिले आहे. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पथकामध्ये त्यांनी दोन वर्षे रिपोर्टिंग केले आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये त्यांची सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयात माहिती सहायक म्हणून बदली झाली होती.
    वंदे मातरम पत्रकार संघातर्फे सोलापूरचे अध्यक्ष योगेश तुरेराव, उपाध्यक्ष बाळू गोणे, सचिव नागेश मग्रूमखाने, साप्ताहिक लोक उद्धारचे संपादक ज्येष्ठ पत्रकार श्रीरंग कदम, साप्ताहिक वर्चस्वचे संपादक नागेश तुरेराव, साप्ताहिक चोख उत्तरचे संपादक वामन निंबाळकर, साप्ताहिक बंजारा दर्पणचे संपादक राजकुमार पवार, दैनिक सोलापूर भूषणचे संपादक महेश उंडाळे, साप्ताहिक नमस्कारचे संपादक अजित वाघमोडे, साप्ताहिक सोलापूर गर्जनाचे संपादक नागय्या कलाल, ज्येष्ठ छायाचित्रकार नागेश दंतकाळे, साप्ताहिक बहुजन सोलापूरचे संपादक सुनिल पेंटर आदींनी श्री. अर्जुन यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सन्मान केला.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads