Social Media Income Tips: सोशल मीडियाद्वारे पैसे कमवायचे आहेत, तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा - दैनिक शिवस्वराज्य

Social Media Income Tips: सोशल मीडियाद्वारे पैसे कमवायचे आहेत, तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा

सध्याचा जमाना हा डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे. इंटरनेटमुळे पुर्ण जग आपल्यासोबत जोडलं गेलं आहे. सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म हा ज्याच्यामुळे एका रात्रीत सर्वसामान्य व्यक्ती देखील सुपरस्टार बनू शकतो.

मात्र, या माध्यमाचा वापर काही जण फक्त रिल्स बघण्यासाठी करतात, तर काहीजण या माध्यमाचा योग्य प्रकारे वापर करत आपली आर्थिक आणि बौद्धीक प्रगती करुन घेतात.

कोरोनामुळे नोकरी गेलेल्या अनेकांनी सोशल मीडियाचा वापर करुन लाखो रुपये कमावल्याची उदाहरण देता येतील. मात्र, सोशल मीडियाद्वारे पैसे कमावण्यासाठी नक्की काय करावं लागतं याबबातची माहिती बऱ्याच लोकांना नसते. तीच माहिती आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत. सोशल मीडियावरुन कमाई करणाऱ्यांना इन्फ्लुएंसर असं म्हटलं जातं.

आणखी वाचा- ब्ल्यू टीक शुल्क, बनावट खाती, इत्यादींमुळे ट्विटर नकोसे वाटतंय? खाते डिलीट करायचे असल्यास 'हे' करा

अनेकांना आपण करत असलेल्या नोकरीचा कंटाळा येतो किंवा कमी पगाराच्या नोकरीच्या नोकरीमुळे खर्च भागात नसल्याची समस्या असते. अशा लोकांसाठी जॉब करत असतानाच सोशल मीडियाद्वारे जास्तीचे पैसे कमावणे सोप्प आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला तुमचा अधिकचा वेळ आणि बुद्धीला चालना द्यावी लागणार आहे. तरच चुम्ही एक यशस्वी इन्फ्लुएंसर बणू शकता.

अस्थिरता –

जेव्हा तुम्ही नोकरी करत असता त्यावेळी तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम जमा होत असते. पण इन्फ्लुएंसर म्हणून काम करताना तसं होत नाही. कारण त्यासाठी तुम्हाला कधी जास्तीचे पैसे भेटू शकतात. तर कधी कधी मिळतही देखील नाहीत त्यासाठी तुम्हाला वाट पाहण्याची सवय लावून घ्यावी लागेल.

वेळ –

आणखी वाचा- UPI 123PAY वापरुन स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय भरता येणार वीजबिल; जाणून घ्या सोप्या स्टेप्स

नोकरीमध्ये आपण एका ठरवून दिलेल्या वेळेत काम करत असतो. मात्र, इन्फ्लुएंसर म्हणून काम करत असताना तुम्हाला वेळेचं आणि जागेची बंधने नसते. प्रामुख्याने सुरुवातीच्या काळात तुम्हाला त्या कामामध्ये स्वत:ला झोकून द्यावं लागतं. कारण तुम्हाला सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठीचा कंटेंट लिहणं, त्यासाठी रिसर्च करणं, स्क्रिप्टिंग, शुटींगपासून ते एडिटिंगपर्यंतची सर्व कामे स्वत:ला करावी लागतात.

क्रिएटिव्ह असणं गरजेचे –

नोकरी करताना आपलं काम एका ठराविक प्रकारे करण्याचं ठरलेलं असतं. पण तुम्ही ज्यावेळी सोशल मीडियासाठी काही करणार असता त्यावेळी लोकांना आवडेल, रुचेल अशा प्रकारचा कंटेंट तयार करावा लागतो आणि त्यासाठी तुम्हाला क्रिएटिव्ह असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही उत्तम आणि यशस्वी इन्फ्लुएंसर बणू शकता.

आणखी वाचा- अनइन्स्टॉल न करता स्मार्टफोनमध्ये App Hide कसे करायचे जाणून घ्या

उत्तम कंटेंटसाठी टिप्स –

  • इंस्टाग्राम बिजनेस अकाउंट आणि युट्यूब चैनल तयार करा आणि त्यामध्ये तुमची माहिती वैविध्य आणि अर्थपुर्ण पद्धतीने भरा.
  • कंटेंटसाठी तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्यातील स्पर्धेबाबतची माहिती घेऊन त्याचं विश्लेषण करा.
  • तुमचा कंटेंट हा इतरांपेक्षा वेगळा आणि दर्जेदार बनवा.
  • तुम्ही बनवत असलेल्या व्हिडीओ कंटेटची क्वालिटी चांगली असायला हवी.
  • सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही करत असलेल्या व्हिडीओसाठीचे हेडींग योग्य आणि समर्पक शब्दांचे करा. जेणेकरुन वापरकर्त्यांना तुम्ही केलेला व्हिडीओ लगेच शोधता येईल. शिवाय लोकांना त्या प्रकारचा कंटेंट बघण्याची सवय देखील लागेल.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads