राष्ट्रीय जीत कुनोडो स्पर्धेत आदित्य मनोज मदने आणि आर्या मनोज मदने यांनी पटकावले सुवर्णपदक.. - दैनिक शिवस्वराज्य

राष्ट्रीय जीत कुनोडो स्पर्धेत आदित्य मनोज मदने आणि आर्या मनोज मदने यांनी पटकावले सुवर्णपदक..


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : मध्य प्रदेशातील उज्जैन येथे नुकत्याच झालेल्या 34 व्या राष्ट्रीय जित जीत कुनोडो स्पर्धेत केन्द्रीय विध्यालय संघटन सोलापूर येथे इयत्ता 7 वीत शिकत असलेला आदित्य मदने याने 34 Kg वजन गटात सुवर्णपदक पटकावले तर आर्या मदने याने 22 kg वजन गटात सुवर्ण पदक पटकावले. 
  या राष्ट्रीय स्पर्धेत 18 राज्यातील सुमारे 400 खेळाडूंनी विविध वजन गटात सहभागी झाले होते. 
  या स्पर्धेसाठी जीत कुनोडो चे महाराष्ट्राचे अध्यक्ष अभीजीत गायकवाड, टेकनिकल डायरेक्टर बालाजी कांबळे , सरचिटनीस [ग्रँडमास्टर ] युवराज गायकवाड, लेडीज कोच सत्यभामा गायकवाड या सर्वाचे मार्गदर्शन लाभले. 
 यावेळी उज्जैन येथील क्षीरसागर स्टेडीयम येथे आयोजित स्पर्धेत उज्जैनचे अ.भा. जीत कुनोडो फाऊंडेशनचे सरचिटनीस सुमित गिहारा यांनी आदित्य मदने व आर्या मदने यांचे सुवर्ण पदक मिळवल्या बद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads