महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमअंतर्गत अधिसूचित सेवा ऑनलाईन मिळणार - दैनिक शिवस्वराज्य

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमअंतर्गत अधिसूचित सेवा ऑनलाईन मिळणार

समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमल- बजावणीसाठी अधिसुचित केलेल्या सर्व सेवा नागरिकांना पुर्णतः ऑन लाईन पद्धतीने पुरविण्याबाबत शासन निर्देश प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसूचित सर्व सेवा / दाखले ऑनलाईन पध्दतीने आपले सरकार सेवा केंद्रामार्फत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शहर / ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार ढोक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
   पत्रकात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यात विविध शहरी व ग्रामीण भागात स्थापन केलेले / कार्यान्वित असलेले आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत शासकीय विविध सेवा व दाखले हे ऑनलाईन पध्दतीने वितरण केले जात आहेत. याबाबत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्या, मुंबई यांचे https://aaplesarkar.mahaonline.gov.in या / तसेच सोलापूर जिल्ह्याच्या https://solapur.gov.in या संकेतस्थळावर कार्यान्वित असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
    नागरिकांनी विविध शासकीय सेवा / दाखले लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्या, मुंबई यांच्याकडून विकसित करण्यात आलेल्या वरील संकेतस्थळाचा वापर करावा. या संकेत स्थळावर एकदा ऑनलाईन ओळख निर्माण झाल्यावर त्यांचा वापर करून आपण विविध शासकीय सेवा / दाखले याचा लाभ घेण्याकरिता ऑन लाईन अर्ज, सेवा शुल्क भरणे, कागदपत्रे / दस्तऐवज अपलोड करणे, अर्जाचा मागोवा घेणे, मंजुर दाखल्याची पत्र सुध्दा ऑनलाईन ध्ये उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी FIFO (First In First Out ) प्रणालीचा वापर केला जात आहे.
     या सेवेसाठी महाराष्ट्र तंत्रज्ञान महामंडळ मर्या, मुंबई यांच्याकडून विकसित करण्यात आलेले मोबाईल अँप https://itunes.apple.com/in/app/rts-maharashtra किंवा RTS Maharashtra या संकेत स्थळावरून आपल्या मोबाईलवर विनामूल्य डाऊनलोड करून घेऊन त्याव्दारे शासकीय सेवा / विविध दाखले ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सदर अॅपचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ प्यावा.
   आपले सरकार सेवा केंद्र / केंद्र चालक किंवा तांत्रिक अडचणीबाबत नागरिकांना काही तक्रार / अडचणी असल्यास महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्या, मुंबई यांच्या 24 x 7 नागरी संपर्क केंद्र 1800 1208040 (टोल फ्री) निःशुल्क टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे पत्रकात म्हटले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads