ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन सुरु14567 या राष्ट्रीय हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन.. - दैनिक शिवस्वराज्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन सुरु14567 या राष्ट्रीय हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन..


समीर शेख प्रतिनिधी
सोलापुर : सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी, सर्व राज्यात 14567 ही राष्ट्रीय हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन चालवली जात असल्याची माहिती प्रकल्प व्यवस्थापक स्मितेश शहा यांनी सांगितले.
     या राष्ट्रीय हेल्पलाइनचा उद्देश हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण हा आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तीची काळजी घेणे इतर इतर सेवांसाठी ही हेल्पलाईन उपयोगी ठरणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा डिशनद्वारे चालवली जात आहे. हेल्पलाइन ची वेळ सकाळी 8.00 वा. ते संध्याकाळी 8.00 वाजेपर्यंत असेल व वर्षातील 365 पैकी 361 दिवस सुरू राहणार आहे. यामध्ये 4 दिवस बंद असेल. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर आणि 1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी हेल्पलाईन बंद असेल.
     हेल्पलाइन मार्फत आरोग्य, जागरुकता, निदान, उपचार, निवारा, वृद्धाश्रम घरे, डे केअर सेंटर पोषण विषयक, ज्येष्ठां संबंधी अनुकूल उत्पादने तसेच सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक इत्यादी बाबत माहिती दिली जाते. यामध्ये कायदेविषयक मार्गदर्शन, विवाद निराकरण, पेन्शन संबंधित मार्गदर्शन, क्षेत्रीय पातळीवर मदत, बेघर, अत्याचारग्रस्त वृद्ध ज्येष्ठा हरवलेले व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी हेल्पलाईन कार्यरत आहे.
    सदर हेल्पलाइन साठी सर्व जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधी (FRO) नियुक्त केलेले आहेत. हेल्पलाइन 14567 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा जेणेकरून वृद्ध व्यक्तीची योग्य ती मदत करून त्यांची काळजी घेता येईल असे आवाहनही प्रकल्प व्यवस्थापक स्मितेश शहा यांनी केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads