महाराष्ट्र
मंद्रुपच्या शाळेतील चिमुकल्यांनी हुसेनशाह मकानदार यांच्या शेतात 'वनभोजनाचा' घेतला मनमुराद आनंद ...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : शालेय उपक्रमासोबतच वनभोजन या सहशालेय उपक्रमाचे शाळांकडून आयोजन केली जाते. चार भिंतीच्या आतील बंदिस्त अभ्यासक्रम एकदिवस टाळून निसर्गाच्या सानिध्यात झाडे, पशु, पक्षी, वेली यांच्याशी गुज गोष्टी करीत अनेक अनुभवांची समृद्धी हस्तगत करुन घेण्यासाठी निसर्ग शाळा हा उपक्रम घेण्यात येतो. कोरोनाचा प्रभाव असल्याने गेल्या दोन वर्षे शाळा बंदच होती. शाळा बंद असल्यामुळे सर्व शालेय व सहशालेय उपक्रम स्थगित करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप उर्दु जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी वनभोजन या कार्यक्रमातून मंद्रुपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हुसेनशाह मकानदार यांच्या शेतातील फार्महाऊसवर निसर्ग शाळेचा मनमुराद आनंद घेतला.
मंद्रुप उर्दु प्राथमिक शाळेला जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापिका जहॉआरा तांबोळी, शिक्षिका फरजाना सय्यद, कादर करजगी, बदरूनिस्सा सगरी, अख्तर शेख, महेमुद नवाज या सर्व शिक्षकांचा हुसेनशाह मकानदार व ग्रामसेवक नागेश जोडमोठे यांनी सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी केंद्रप्रमुख शिवाजी जाधव, मन्सूरअली मकानदार, बेलाटीचे अब्बास शेख, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रसुल शिकलगार, जावेद शेख, आरिफ शेख, अल्ताफ शेख, मौलाना आझाद सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सिकंदर आवटे, उपाध्यक्ष महमद शेख, आसीफ शेख, समीर मुल्ला आदि उपस्थित होते. मंद्रुपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हुसेनशाह मकानदार व त्यांच्या कुटूंबीयांनी स्वखर्चाने बनवलेल्या स्वादिष्ट भोजनाचे आस्वाद निसर्गाच्या सानिध्यात वनभोजन कार्यक्रमात सहभागी झलेल्या सर्व उपस्थितांनी घेतला.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा