सिद्धापूरचे ग्रामदैवत मातुर्लिंग यात्रा सोमवारी 16 जानेवारी रोजी होणार ; श्री ची महापूजा `याʼ मान्यवरांच्या शुभहस्ते ; मातुर्लिंग गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांची माहिती... - दैनिक शिवस्वराज्य

सिद्धापूरचे ग्रामदैवत मातुर्लिंग यात्रा सोमवारी 16 जानेवारी रोजी होणार ; श्री ची महापूजा `याʼ मान्यवरांच्या शुभहस्ते ; मातुर्लिंग गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांची माहिती...


सलीम शेख प्रतिनिधी.
मंगळवेढा:- सिद्धापूर गावचे ग्रामदैवत मातुर्लिंग गणपती यात्रा सोमवार दिनांक 16 जानेवारी रोजी होत असल्याची माहिती मातुर्लिंग गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अप्पासाहेब धुळगोंडा पाटील यांनी दिली.
  महाराष्ट्र , कर्नाटक सह लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले मातुर्लिंग गणपतीच्या यात्रा पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या वतीने तयारी करण्यात आली आहे.
  16 जानेवारी सोमवारी पहाटे श्री ची महापूजा पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते व सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक व आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
  यात्रेसाठी येणाऱ्या भाविकासाठी मंगळवेढा आगारातून ज्यादा बसेसची सोय करण्यात आली आहे.
   नदीपात्रात असणाऱ्या स्वयंभू गणपतीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी ग्रामपंचायत कडून नदीपात्रात रस्ता बनवण्यात आला आहे. 
  यात्रे दिवशी सायंकाळी श्री च्या पालखीचे मिरवणूक होणार आहे व यावेळी नयनरम्य आतषबाजी करण्यात येणार आहे. आलेल्या भाविकांच्या मनोरंजनासाठी जय हनुमान नाट्य संघ सिद्धापूर यांच्या वतीने कन्नड सामाजिक नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
   यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads