महाराष्ट्र
न्यू इंग्लिश स्कूल, कुसूर विद्यालयाच्या प्रकल्पाची राज्यस्तरीय निवड...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी भारत सरकार मार्फत शालेय विद्यार्थ्यांचे सर्जनशील विचार रुजवण्याच्या उद्देशाने दर वर्षी इन्स्पायर अवॉर्ड मानक योजनेद्वारे देशभरातील शाळेतून प्रकल्प मागविले जातात. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रातील २९२५ विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी अवॉर्ड मंजूर झाले होते. त्यापैकी सोलापूर जिल्हयातील ९७ विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठीची संधी प्राप्त झाली. जिल्हास्तरीय निवड झालेल्या या सर्व विद्यार्थ्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन ऑनलाइनपद्धतीने करण्यात आले. अवॉर्डी विद्यार्थ्यांच्या आपलोड प्रोटोटाइपचे परीक्षण मा.संचालक एन.आय.एफ. इंडिया, अहमदाबाद यांनी गठित केलेल्या समितीद्वारे करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातून ९७ पैकी १० प्रकल्पांची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी झाली.
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, कुसूर दक्षिण सोलापूर विद्यालयातील इयत्ता नववीतील दीपक विजयकुमार पुजारी याने तयार केलेल्या प्रकल्पाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली. या प्रशालेतून राज्यस्तरासाठी निवड होण्याचे हे तिसरे वर्ष आहे. या आधी सन २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये विद्यालयाच्या प्रकल्पांची निवड झालेली होती. ग्रामीण भागातील या विद्यालयाचे विविध क्षेत्रातील यशाचा चढता आलेख पाहून यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकाचे आणि विद्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक आझाद काझी यांचे प्रोत्साहन, विभाग प्रमुख अब्दुलकादर शेख यांचे मार्गदर्शन तसेच शिक्षक दत्तात्रय पवार, सचिन पाटील, संतोष पाटील, लिपिक भीमाशंकर सोनगे आणि सेवक रशीद शेख यांचे मोलाचे सहकार्य या विद्यार्थ्यास लाभले. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील, सचिव शिवणकर, सहसचिव राजेंद्र साळुंखे, विभागीय चेअरमन संजीव पाटील, सहाय्यक अधिकारी सुरेशकुमार गोडसे, शालेय स्कूल कमिटी सदस्य बाळप्पा कल्लप्पा नांगरे मामा, शालेय व्यवस्थान समितीचे सदस्य, शिक्षक पालक संघाचे सदस्य, उपसरपंच, माजी विद्यार्थी संघ, सोसायटीचे चेअरमन व युवा नेते सुनील नांगरे सर यांचासह समस्त पालकांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा