महाराष्ट्र
न्यू इंग्लिश स्कूल, कुसूर विद्यालयाच्या प्रकल्पाची इंस्पायर अवॉर्ड 2022-23 साठी निवड...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप ) : डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी भारत सरकार मार्फत प्रत्येक वर्षी मुलांच्या उत्कृष्ट प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना इंस्पायर अवॉर्ड दिली जातात. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये सोलापूर जिल्हयातील ७४ विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झालेली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, कुसूर दक्षिण सोलापूर विद्यालयातील इयत्ता आठवी वर्गातील विकास मल्लप्पा बिराजदार या विद्यार्थ्याने तयार केलेल्या प्रकल्पाची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. विशेष बाब म्हणजे या विद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड होण्याचे हे सलग चौथे वर्ष आहे. ग्रामीण भागातील या विद्यालयाचे विविध क्षेत्रातील यशाचा चढता आलेख पाहून यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकाचे आणि विद्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यासाठी विज्ञान विभाग प्रमुख अब्दुलकादर शेख यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. विविध उपक्रम राबविणारे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नेहमी प्रोत्साहन देणारे विद्यालयाचे मुख्याध्यापक आझाद काझी, शिक्षक दत्तासो पवार, सचिन पाटील, संतोष पाटील, सेवक रशीद शेख यांचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील, सचिव शिवणकर, सहसचिव आणि अधिकारी राजेंद्र साळुंखे, विभागीय चेअरमन संजीव पाटील, सहाय्यक सुरेशकुमार गोडसे, शालेय स्कूल कमिटी सदस्य बाळप्पा कल्लप्पा नांगरे मामा, शालेय व्यवस्थान समितीचे सदस्य, शिक्षक पालक संघाचे सदस्य, सरपंच , उपसरपंच, माजी विद्यार्थी संघ, युवा नेते आणि सोसायटीचे चेअरमन , विद्यालयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी नेहमी साथ देणारे सुनील नांगरे यांचासह समस्त पालकांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा