25 जानेवारीला व्यवसाय सुलभता कार्यशाळा... - दैनिक शिवस्वराज्य

25 जानेवारीला व्यवसाय सुलभता कार्यशाळा...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : उद्योग विभाग तसेच मैत्री कक्ष महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील उद्योजकांसाठी उद्योग सुलभता व व्यवसाय वाढीस अनुकुल वातावरणास चालना मिळण्यासाठी बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाऊंडेशन सभागृह, प्लाट के. सी. 9/15, एम.आय.डी.सी. अक्कलकोट रोड, सोलापुर येथे कार्यशाळा आयोजीत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी दिली आहे.
     दिनांक 06 जानेवारीपासून राज्यभर "व्यवसाय सुलभता (Ease of doing Business) कार्यशाळा आयोजीत करण्यात आलेल्या आहेत. या कार्यशाळेचा उददेश उद्योजक व व्यवसायीकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा असून, तंत्रज्ञानाच्या पातळीवर केल्या जाणा-या सुधारणाविषयी मैत्री कक्ष मुंबई यांच्या कार्यरत सल्लागार पथकाकडून सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी जिल्हयातील सर्व औद्योगीक संघटना, नामांकीत उद्योजक, सनदी लेखापाल, उद्योग व्यवसायाशी संबधीत सर्व शासकीय विभागांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads