कवी रामनाथ जऱ्हाड यांना मानद डॉक्टरेट अवार्ड प्रदान.... - दैनिक शिवस्वराज्य

कवी रामनाथ जऱ्हाड यांना मानद डॉक्टरेट अवार्ड प्रदान....


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील रहिवासी, महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक व कवी, निर्भीड पत्रकार आणि पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ जऱ्हाड यांना पंजाब राज्यातील नोबेल पुरस्कार प्राप्त डॉ. चंद्रकला सिंग यांच्या हस्ते राहुरी येथे मानद डॉक्टरेट अवार्ड प्रदान करण्यात आला. यावेळी राहुरीचे डॉ. मनोजकुमार केदार,विकास भडकवाड आदी उपस्थित होते.
  रामनाथ जऱ्हाड हे गेली 40 वर्षापासून महाराष्ट्रातील सुमारे 5000 पेक्षा जास्त पत्रकारांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यांनी आजतागायत 14 पुस्तके, पाच कवितासंग्रह ,कथा, कादंबरी विशेषतः ग्रामीण कथा लिहिले आहेत. त्यांना 400 हून अधिक पुरस्कार यापूर्वी मिळाले आहेत. यामध्ये समाजभूषण,
     समाजगौरव ,उत्कृष्ट साहित्यिक, आदर्श कवी, नवरत्न, धनगर कवी अशा स्वरूपाचे पुरस्कार मिळाले आहेत. 
 मानवतावादी आणि सामुदायिक कार्य तसेच शाश्वत विकासाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योगदान देणाऱ्या त्यांच्या कार्याद्वारे मानवता आणि जागतिक शांततेच्या बाजूने, महिलांवरील हिंसाचार आणि मानवते विरुद्धच्या गुन्हांना नकार या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरीय रामनाथ जऱ्हाड यांना मानद डॉक्टरेट अवॉर्डसाठी निवड केली आहे. त्यांना मुंबई येथील विश्व शांती दूतचे संचालक डॉ. सुधीर तारे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. 
    या त्यांच्या यशाबद्दल पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष संभाजी साठे, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब लोखंडे, पश्चिम महाराष्ट्राचे सल्लागार नवनाथ गायकवाड, पश्चिम महाराष्ट्राचे महासचिव विजयकुमार लोंढे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रा. संग्राम कांबळे, सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष समीर शेख, रवी देवकर, द्रोपदी हाले, सुरेखा भालेराव, अभिजीत भंडारे आदींनी अभिनंदन करून पुढीलवाटचालीस हार्दिक शुभेेच्छा दिल्या.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads