महाराष्ट्र
पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी समीर शेख यांची तर जिल्हाध्यक्षपदी प्रा.संग्राम कांबळे यांची निवड.... पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र महासचिवपदी विजयकुमार लोंढे यांची निवड
समीर शेख प्रतिनधी
सोलापूर ( मंद्रूप) : पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पत्रकारांचा गौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष संभाजी साठे होते. यावेळी पत्रकार सेवा संघ पश्चिम महाराष्ट्राचे सल्लागार नवनाथ गायकवाड, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ जराड यांच्या आदेशानुसार जिल्हा सल्लागार रवी देवकर यांनी पत्रकार सेवा संघाची सोलापूर तालुका कार्यकारणी जाहीर केली.
या कार्यकारणीत सोलापूर व दक्षिण सोलापूर, अक्कलकोट , मोहोळ, मंगळवेढा,पंढरपूर या तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
सोलापुर जिल्हा अध्यक्षपदी सघपाल कांबळे तर जिल्हा उपाअध्यक्षपदी समीर शेख निवड करण्यात आली. व महिला जिल्हाध्यक्षपदी द्रोपदी हाले तर उपाध्यक्षपदी सुरेखा भालेराव, सचिवपदी रवी देवकर नियोजन प्रमुखपदी श्रीकांत हाले व सदस्य पदी मल्लीकार्जुन कांबळे,अशोक सोनकंटले यांची निवड करण्यात आली.
व दक्षिण सोलापूर तालुक्यातील तालुका अध्यक्ष पदी इलियासअली यांची तर उपाध्यक्ष पदी महेश पवार यांची तर निरंजन खांडे यांची खजिनदारपदी व गुरु गायकवाड यांची सहसचिवपदी व शहाबुद्दीन नदाफ व सिद्धाराम बिराजदार,तुकाराम शेंडगे यांची सदस्यपदी व रणजित जाधव यांची प्रसिद्ध प्रमुखपदी निवड करण्यात आली.
यानंतर कार्याध्यक्ष संभाजी साठे यांनी पत्रकार सेवा संघाच्या पश्चिम महाराष्ट्र महासचिवपदी विजयकुमार लोंढे यांची निवड जाहीर केली.
निवडीनंतर नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्ष स्थानावरून बोलताना संभाजी साठे म्हणाले, दृकश्राव्य माध्यमावर आजही लोकांचा विश्वास असल्याचे सांगून पत्रकारांनी सर्व घटकांचे कान आणि डोळे बनण्याची आवश्यकता आहे. पत्रकारांनी मतप्रदर्शन करण्यापेक्षा योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करावा असे सांगत लवकरच मुख्यमंत्री यांची वेळ घेऊन शिर्डी येथे पत्रकार सेवा संघाचे अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यानंतर प्रमुख पाहुणे बाळासाहेब लोखंडे म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. याची सातत्याने जाणीव ठेवून प्रशासनाला वळण लावण्याचे कार्य करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या प्रास्तविकेत नवनाथ गायकवाड यांनी पत्रकार सेवा संघाची रुपरेषा सांगून पत्रकारांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे सांगितले.
सूत्रसंचालन संग्राम कांबळे यांनी केले तर विजयकुमार लोंढे यांनी आभार मानले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा