सागर सिमेंट लिमिटेड च्या मुख्यालयास सोलापूरचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली सदिच्छा भेट.. हैद्राबादमध्ये रेड्डीनीं केले महादेव कोगनुरेंचे कौतुक.... - दैनिक शिवस्वराज्य

सागर सिमेंट लिमिटेड च्या मुख्यालयास सोलापूरचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली सदिच्छा भेट.. हैद्राबादमध्ये रेड्डीनीं केले महादेव कोगनुरेंचे कौतुक....


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : हैद्राबाद येथील सागर सिमेंट लिमिटेड च्या मुख्यालयास सोलापूरचे लोकप्रिय खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सागर सिमेंट महाराष्ट्र राज्याचे मुख्य व्यवस्थापक व एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांच्या समवेत भेट दिली.
     सागर सिमेंटचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकांत रेड्डी व सिद्धार्थ रेड्डी यांनी खासदार महास्वामीजी यांचे स्वागत केले.महाराष्ट्रामध्ये आज सागर सिमेंट जे नावारूपास आले त्यात महादेव कोगनुरे यांचा सिंहाचा वाटा आहे असे गौरवोद्गार श्रीकांत रेड्डी यांनी काढले व भविष्यातील योजना संबंधीची माहिती दिली.
    आज सागर सिमेंटचे महाराष्ट्रात महादेव कोगनुरे यांनी एवढे मार्केटिंग केले आहे की सोलापूर भागामध्ये सागर सिमेंटची स्वतःची एक फॅक्टरी असणे अनिवार्य आहे आणि तसेच त्यातून सोलापूर मध्ये नवीन रोजगार निर्मिती हि होईल ह्या अनुषंगाने खासदार महास्वामीजी यांनी श्रीकांत रेड्डी यांच्याशी चर्चा केली.
    सागर सिमेंट चे मार्केटिंग सर्वेसर्वा राजेश सिंग ह्यांनी सिमेंट क्षेत्रातील विवीध पैलू उलगडून सांगितले.
    तसेच भेटी दरम्यान सिमेंट क्षेत्राविषयी, अध्यात्मिक तसेच विविध गोष्टीवर महास्वामीजी यांनी श्रीकांत रेड्डी यांच्या सोबत चर्चा केली. 
    याप्रसंगी सागर सिमेंटचे सहायक उपाध्यक्ष वासूदेव राव, कंपनी अधिकारी अजित पाटील, सागर सिमेंट लातूरचे विक्रेते सुरेश शर्मा, उद्योजक राजशेखर हत्ती, सिद्धाय्या स्वामी हिरेमठ, योगीराज हिरेमठ, महेश हिरेमठ सिद्धराम कमळीमठ आदींची उपस्थिती होती.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads