वन विभागामार्फत विविध क्रीडा स्पर्धा... - दैनिक शिवस्वराज्य

वन विभागामार्फत विविध क्रीडा स्पर्धा...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : वन विभागामार्फत जिल्ह्यात विविध वनपरिक्षेत्रात विभागीय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत. दिनांक 02 जानेवारी 2023 रोजी पंढरपूर येथील मौजे कासेगाव येथे स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धा 3, 6 व 8 जानेवारी 2023 या दिवशी होणार आहेत.
    उपवनसंरक्षक सोलापूर वन विभाग धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात येत आहेत. वन विभागाचे क्षेत्रीय तसेच कार्यालयीन कर्मचारी यांच्यावर असलेल्या दैनंदिन कामाचा ताण कमी करण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
    या क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी, व्हॉलिबॉल, क्रिकेट, याचबरोबर धावणे, भाला फेक, गोळा फेक, रस्सी खेच, लांब उडी, उंच उडी इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये परिक्षेत्र निहाय संघ तसेच विभागीय कार्यालय सोलापूर संघ या संघाचा समावेश करण्यात आला आहे. क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads