महाराष्ट्र
द.सोलापूर तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत लंगडी व धावण्याच्या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावडेवाडीचे यश...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) :दि.30 डिसेंबर रोजी स्वामी विवेकानंद हायस्कूल सोलापूर येथील द.सोलापूर तालुका स्तरीय (जिल्हा परिषद शाळा)क्रीडा स्पर्धेत लंगडी व धावण्याच्या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावडेवाडीने निर्विवाद यश मिळवले.
1) लंगडी मोठा गट मुले - विजेता,
2.लंगडी मोठा गट मुली - विजेता
3.लंगडी छोटा गट मुले - विजेता
वैयक्तिक स्पर्धा धावणे - 100 मी स्पर्धेत मोठा गट मुलींमध्ये समृद्धी गावडे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर लहान गट मुलींमध्ये प्रतिक्षा कोळेकर हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.
या सर्व विद्यार्थ्यांना डॉ.नागनाथ येवले सर यांनी मार्गदर्शन केले. विजयी संघाचे कौतुक आचार्य डॉ. ह.ना. जगताप सर, BDO श्री. वाघ साहेब, शिक्षण अधिकारी श्री जावीर, गट शिक्षण अधिकारी श्री. बनसोडे सर, केंद्रप्रमुख श्री. बिराजदार सर, सरपंच श्री. सुखदेव गावडे, SMC अध्यक्ष श्री. बिरूदेव गावडे, उद्योजक तथा मुलांचे दाते श्री. कैलास पांढरे , मुख्याध्यापिका सौ. देशपांडे मॅडम ,सौ. जाधव मॅडम, सौ.वाघमारे, श्रीम.व्हलकांबे मॅडम मॅडम, श्री भडकुंबे सर, श्री. राऊत सर, श्री. हराळे सर, श्री.दीपक Marntande सर,आदींनी कौतुक केले व जिल्हा स्तर साठी शुभेच्छा दिल्या.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा