राजमाता जिजाऊ , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा आदर्श समाजातील सर्वच घटकांनी घ्यावा- युवा नेते राहुल चव्हाण
प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर तालुक्यातील शेंगोळा गावात राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
तसेच विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आलेले होते. त्या कार्यक्रमाचे विजयी खेळाडू यांना पारितोषिक वितरण वंदन मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक व युवासेनेचे उप-जिल्हाप्रमुख श्री.राहुल चव्हाण यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले होते.
व्याख्यान प्रसंगी स्त्री-शिक्षणाचे महत्त्व,देशासाठी योगदान,समाजासाठी आवश्यक कार्य,वाढती जातीयता, वाढती व्यसनाधीनता, दैनंदिन जीवनात आवश्यक देशभक्ती त्याचे उदाहरणे,देशविरोधी कारवाया, लव्ह-जिहाद,वाढते धर्मातरणाचे प्रमाण, स्वामी विवेकानंद यांना आदर्श ठेवून तरुणांनानी समाज कार्यासाठी पुढे यायला हवं इ.विषयावर आपल्या व्याख्यान प्रसंगी त्यांनी मांडले. (विशेष करून महिलांनी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्यावा)
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा