महाराष्ट्र
🛑नांदणी टोलनाका येथे 41,58,800 रूपये किंमतीच्या गुटख्यासह ट्रक जप्त : मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल मंद्रुप पोलिस स्टेशन ची धमाकेदार कामगिरी...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर(मंद्रूप) : दि. 07 मार्च 2023 रोजी अन्न व औषध प्रशासन विभागास माहिती मिळाली होती की, एका बारा टायर च्या ट्रकमध्ये गुटखा असून सदरचा ट्रक विजयपूरहुन सोलापुरकडे जात आहे. त्या बातमीनुसार अन्न व औषध प्रशासनाचे श्री. कुचेकर व स्टाफ यांनी नांदणी टोलनाका येथे सदर चा ट्रक पकडून त्याची पाहणी केली असता त्यात प्रतिबंधित पान मसाला व प्रतिबंधित सुगंधी तंबाखू मिळून आली. प्रतिबंधित पान मसाला, प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, ट्रक, मोबाईल असा एकून ₹ 41,58,800 /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मंद्रुप पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
🛑पोलिसांची तत्परता : मुख्य खरेदीदार आरोपी ताब्यात
औरंगाबाद येथील सदर प्रतिबंधित हिरा पानमसाला व सुगंधित तंबाखू मालाचा खरेदीदार हा औरंगाबाद हुन अटकपूर्व जामीन घेण्यासाठी सोलापुर येथे येणार असल्याची माहिती ह्या गुन्ह्याचे तपासी अधिकारी सपोनि रवींद्र मांजरे यांना मिळाली. त्यापूर्वीच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या तांत्रिक टीमची मदत घेऊन खरेदीदार आरोपीस पाठलग करून फक्त आरोपीच्या मोबाईल नंबरच्या आधारे सोलापुरातून ताब्यात घेतले. सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस हवालदार मोरे, पोलीस शिपाई लखन पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार मोहन मनसावले, धनाजी गाडे यांनी बजावली.
सदर गुन्ह्याचा अधिकचा तपास शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक सोलापुर ग्रामीण, हिंमत जाधव अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे करीत आहेत.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा